फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर

फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जे केवळ शाकाहार घेतात त्यांना ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड मिळवण्यासाठी अक्रोड हा सर्वात चांगला पर्याय आहे. अक्रोडच्या टरफलांमध्येही औषधी गुणधर्म आहेत. अक्रोडमधील व्हिटॅमिन ए हे आर्टरीजमध्ये प्लाक जमा होऊ देत नाही. यातील न्यूट्रीएंट्स शरीरातील आर्टरीजचा ब्लॉकेजपासून बचाव करतात. सकाळ, संध्याकाळ २ अक्रोड खाल्ल्याने अनेक आजार आपण दूर ठेवू शकतो. अक्रोडचे नियमित सेवन केल्यास कोणते आरोग्य फायदे होतात, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

उपाय आणि फायदे

रोज सकाळ, संध्याकाळ दोन अक्रोड चावून खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतात. हृदयरोग होत नाहीत.

अक्रोडची टरफलांसह बारीक पावडर करून एक चमचा सकाळ, संध्याकाळ खाल्ल्यास किडनी स्टोन निघून जातो.

रोज दोन अक्रोड मधासोबत खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते.

दोन अक्रोड चार लसणाच्या पाकळ्यांसह तुपात भाजून खाल्ल्यास टीबीच्या आजारात आराम मिळतो.

दोन अक्रोड, एक बदाम, पाच मणुके सकाळ, संध्याकाळ कोमट दुधासोबत घेतल्यास कमजोरी दूर होते.

अक्रोडच्या टरफलांचा काढा तयार करून मध टाकून घेतल्यास पीरियड्सच्या समस्यांपासून आराम मिळातो.

अक्रोडमधील गर भाजून मधासोबत खाल्ल्यास खोकला कमी होतो.

अक्रोडचे टरफल भाजून त्यांचे दंतमंजन तयार करावे. याने दात मजबूत आणि पांढरे होतात.

गरम दुधासोबत अक्रोड खाल्ल्याने पोटातील जंत मरतात.

१० सकाळी उपाशीपोटी दोन अक्रोड आणि एक चमचा सुंठ गरम पाण्यासोबत घेतल्यास सांधेदुखीत आराम मिळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु