‘बेकिंग पावडर’ने मारु शकता घरातील सर्व झुरळ, वाचा ४ सोप्‍या पद्धती

‘बेकिंग पावडर’ने मारु शकता घरातील सर्व झुरळ, वाचा ४ सोप्‍या पद्धती
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – घरात झुरळ झाल्यास तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामुळे वेळीच झुरळांचा बंदोबस्त करणे आवश्यक असते. स्वयंपाक घर, सिंक, पाईप, घाण या ठिकाणी झुरळे वाढल्यास त्रासदायक ठरू शकते. यांचा नायनाट करण्यासाठी काही सोपे उपाय असून हे उपाय आपण आज जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा

दोन मोठे चमचे बोरिक पाउडर आणि दोन मोठे चमचे गव्हाचे पीठ दुधामध्ये मिसळून तिंबून घ्या. या मिश्रणाच्या छोट्या-छोट्या गोळ्या करून झुरळ असतील त्या ठिकाणी ठेवा.

किचनच्या बेसिनमध्ये थोडीशी लवंग ठेवा. बेसिनमध्ये झुरळ दिसणार नाहीत.

बेकिंग पावडर आणि साखर एका वाटीमध्‍ये समप्रमाणात घ्‍या. हे मिश्रण जेथे जेथे झुरळांचा त्रास आहे तेथे पसरवा.

झुरळांचे वास्तव्य असेल तेथे काकडीचा एक तुकडा ठेवा. काकडीचा वास झुरळांना पळवून लावण्यासाठी पुरेसा आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु