वजन कमी-जास्त का होते? जाणून घ्या कारणे

वजन कमी-जास्त का होते? जाणून घ्या कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : सतत काही दिवस उपवास केल्यास शरीराचे काही अवयव डॅमेजही होऊ शकतात. यामुळेच अमरण उपोषण करणारांच्या जीवाला धोका निर्माण होतो. वजन कशामुळे कमी होते आणि दैनंदिन आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

माणसाचे वजन जेवणाचे प्रमाण आणि व्यक्तीची सक्रियता, कार्य, मेहनतीनुसार असते. सामान्यतः व्यक्तीच्या कार्यानुसार त्याची ऊर्जा (कॅलरी)ची मात्रा निर्धारित होते. जास्त मेहनत किंवा व्यायाम केल्याने भूक वाढते. शरीराला पर्याप्त कॅलरी मिळत राहिल्यास वजन सामान्य राहते. परंतु सक्रियता आणि कॅलरी यांचे संतुलन बिघडले तर वजन कमी होते किंवा वाढते. शरीराचे १ पौंड वजन कमी होण्याचा किंवा वाढण्याचा अर्थ शरीरात ३,५०० कॅलरीची कमतरता किंवा वाढ झाली आहे.व्यायाम न करता वजन कमी करण्याचे उपाय आहेत. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.वाढलेले वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही नैसर्गिक पदार्थ असे आहेत,ज्यांच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते. कमी कष्टामध्ये वजन कमी करायचे असल्यास काही छोटे-छोटे उपाय करता येतील.या उपायांमुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.जास्त कार्बोहायडरेट असणार्या पदार्थांपासून दूर रहावे. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायडरेट असते. यामुळे चरबी वाढते. फक्त गव्हाच्या पिठाची पोळी खाण्यापेक्षा गहू, सोयाबीन आणि हरभरे मिश्रित पिठाची पोळी फायदेशीर ठरते.

दररोज पत्ताकोबीचे ज्यूस घ्यावे. पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असतात. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहते. पपई नियमित खाणे चांगले असते. पपईचे सेवन केल्याने कंबरेवरची अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच दह्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घरातच तयार करण्यात आलेले एक ग्लास ताक प्यावे. त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे काळे मीठ आणि हिंग-जीरा पावडर घालण्यास काहीच हरकत नाही. कारल्याची अर्धवट कच्ची भाजी वजन कमी करायला मदत करते. आवळा आणि हळद समान प्रमाणत घेऊन बारीक चूर्ण तयार करा. ताकामध्ये हे चूर्ण टाकून घेतल्यास कंबर बारीक होईल. एक चमचा पुदिन्याच्या रसामध्ये २ चमचे मध मिसळून हे मिश्रण घेतल्यास वजन कमी होते. लाल तिखटातील कॅप्सासिन नावाचा घटक हा वेदनाशामक म्हणूनही फायदेशीर ठरतो.दमा, सर्दी, ताप या आजारात हा पदार्थ पूरक ठरतो. एवढेच नाही, तर वजन कमी करण्यासाठी देखील त्याचा फायदा होऊ शकतो असा दावा संशोधकांनी केला आहे. गाजराचे भरपूर सेवन करावे कारण आधुनिक विज्ञानानेही गाजर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मान्य केले आहे. मध एक काम्पलेक्स साखर आहे, जी लठ्ठपणा कमी करण्यासाठी खुप फायदेशीर ठरते. सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने फायदा होतो. हिरडा किंवा बेहडा यांचे चुर्ण एक-एक चमचा ५० ग्रॅम पडवळाच्या रसात मिसळून एक ग्लास घेतल्यास वजन लवकर कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु