दातांमध्ये वेदना का होतात ? कारणांसह जाणून घ्या ८ ‘खास’ उपाय

दातांमध्ये वेदना का होतात ? कारणांसह जाणून घ्या ८ ‘खास’ उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराच्या अन्य भागात होत असलेल्या वेदना सहन केल्या जाऊ शकतात, पण दातांमधील वेदना असह्य असतात. या वेदनांमुळे व्यक्ती सतत अस्वस्थ राहते. कोणत्याही कामात लक्ष लागत नाहीत. दातांच्या या वेदना दूर करण्यासाठी काही खास उपाय आहेत. हे उपाय केल्यास वेदना ताबडतोब थांबू शकतात. दातांमध्ये वेदना होण्याची कारणे आणि त्यावरील खास उपाय याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत.

ही आहेत कारणे

दातांमध्ये संक्रमण
कान दुखणे
सायनस संक्रमण

उपाय आणि दक्षता

* प्रत्येक सहा महिन्याला डॉक्टरांकडून दात तपासून घ्यावेत.
* खूप गरम आणि खूप थंड पदार्थ खावू नयेत.
* दुखत असलेल्या दाताजवळ लवंग ठेवल्यास आराम मिळेल.
* दिवसातून दोन वेळा ब्रश करा. शक्य असल्यास लिंबाच्या काडीने आठवड्यातून एकदा ब्रश करा.
* चिमुटभर मीठ घेऊन हिरड्यांवर मालिश करा.
* लिंबूच्या रसाचे काही थेंब दात दुखत असलेल्या ठिकाणी टाकल्यास आराम मिळेल.
* दाढ किंवा दात दुखत असलेल्या भागावर कांद्याचा ताजा तुकडा ठेवल्यास वेदना कमी होतील.
* फ्लोराइड टूथपेस्टने ब्रश करा. माऊथ वॉशचा उपयोग करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु