पुरूषांचे केस का गळतात? असू शकतात ही मोठी कारणे, जाणून घ्या

पुरूषांचे केस का गळतात? असू शकतात ही मोठी कारणे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कमी वयात केस गळण्याची समस्या काही पुरूषांमध्ये दिसून येते. पुरूषांचे केस गळण्याच्या समस्येचे अनेक कारणे आहेत, त्यापैकी मोठे कारण म्हणजे एस्ट्रोजेनेटिक एलोपिका म्हणजेच मेल पॅटर्न बोल्डनेस जे डीटीएच हार्मोन्सचे बॅलेंस बिघडल्यामुळे होते. हा बिघाड झाल्यामुळे डोक्याच्या एखाद्या भागातील केस मोठ्याप्रमाणात गळतात. कमी वयातच पुरुषांचे केस का गळू लागतात, ही समस्या दूर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत, याविषयी माहिती घेवूयात.

ही आहेत कारणे

केमिकल्स
हेयर जेल, कलर्स, शाम्पू, कंडीशनरमधील केमिकल्सच्या प्रभावामुहे केस गळतात.

हार्मोन्स
एन्टोजेनेटिक एलोपिका म्हणजेच शरीरात डीटीएच हार्मोन बॅलेंस बिघडणे.

धुम्रपान
तंबाखूमधील निकोटिनमुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात. यामुळे ऑक्सीजन कमी होतो.

दारु
जास्त दारु प्यायल्यामुळे शरीरात विषारी घटक वाढतात. आयरन, झिंक, पाण्याची कमतरता होते.

मानसिक ताण
मानसिक ताण वाढल्यावर शरीरातील हार्मोन्सचे नियंत्रण बिघडते.

अनुवंशिकत
टक्कल पडण्याला जेनेटिक्स हे कारण असू शकते. कुटुंबात पुरुषांचे केस कमी वयात गळाले असतील, तर असे होऊ शकते.

अयोग्य आहार
डायटमध्ये योग्य प्रमाणात पोषकतत्व न घेतल्यास असे होऊ शकते.

स्किन इन्फेक्शन
डोक्यात फंगल इन्फेक्शन, कोंड्याची समस्या होणे.

औषधे
संधिवात, हार्ट डिसिज, ब्लड प्रेशर, थायरॉइडसारख्या औषधांच्या साइड इफेक्टमुळे असे होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु