पांढरे केस, अकाली टक्कल हृदयरोगासाठी कारणीभूत, प्रयोगातील ‘हे’ ६ निष्कर्ष

पांढरे केस, अकाली टक्कल हृदयरोगासाठी कारणीभूत, प्रयोगातील ‘हे’ ६ निष्कर्ष

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  वयाची चाळीशी येण्यापुर्वी जर तुम्हाला टक्कल पडले असेल, केस पांढरे झाले असतील तर हे लठ्ठपणापेक्षा घातक ठरू शकते. कारण हे हृदयरोगाचे लक्षण असल्याचे एका संशोधनात म्हटले आहे. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच याची दखल भारतातीय कार्डिओलॉजी सोसायटीने सुद्धा घेतली आहे.

असे केले संशोधन
१ भारतातील दोन हजार तरुणांची माहिती गोळा करून अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. टक्कल पडलेले आणि पांढरे केस असलेल्या तरुणांमध्ये हृदयरोग होण्याची शक्यता यात जास्त दिसून आली आहे.

२ या संशोधनात कोरोनरी आर्टरी डिसिज असलेल्या ७९० आणि उत्तम आरोग्य असलेल्या १२७० लोकांची माहिती तपासण्यात आली.

३ यातील १२७० लोकांच्या गटाचा उपयोग कंट्रोल ग्रुप म्हणून करण्यात आला. त्यांच्या आतापर्यंतच्या आरोग्याची माहितीही विचारात घेण्यात आली होती.

४ संशोधनात सहभागी झालेल्यांच्या टक्कल पडण्याच्या व केस पांढरे होण्याच्या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर मिळालेले निष्कर्ष हृदयरोगाशी त्यांचा संबंध असल्याचे दिसून आले.

५ कंट्रोल ग्रुपपेक्षा ७९० लोकांच्या गटातील लोकांना अकाली टक्कल किंवा केस पांढरे होण्याची समस्या ५ पटीने जास्त असल्याचे आढळले.

६ हृदयरोग होण्याची शक्यताही कंट्रोल ग्रुपपेक्षा ७९० लोकांच्या गटातील लोकांना ५.६ पटीने अधिक असल्याचे निरीक्षणांमध्ये दिसून आले.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु