कोणत्या पदार्थांमुळे कोणती ‘अ‍ॅलर्जी’ ? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय

कोणत्या पदार्थांमुळे कोणती ‘अ‍ॅलर्जी’ ? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – इम्यून सिस्टिम एबनॉर्मल रिस्पॉन्स म्हणजेच अ‍ॅलजी होय. सेवन केलेला आहार अथवा शरिरासाठी वापरलेले प्रोडक्ट याची अ‍ॅलजी होऊ शकते. डोळ्यातून पाणी येणे, खाज येणे, शिंक येणे, नाक वाहणे, शरीरावर लाल चट्टे पडणे आणि थकवा जाणवणे ही अ‍ॅलर्जीची सामान्य लक्षणे आहेत. तर ताप, सर्दी अ‍ॅलर्जीचे मध्यम लक्षणे आहेत. तर जास्त आजारी पडणे हे अ‍ॅलर्जीचे गंभीर लक्षण आहे.

कशामुळे होते अ‍ॅलर्जी
अ‍ॅलर्जी अनेक कारणांमुळे होते. धूळ, धातु, प्राण्यांचे केस, किडा चावणे अथवा कॉसमॅटिक्स वापरल्याने सुद्धा अ‍ॅलर्जी होऊ शकते. अ‍ॅस्पिरिनने सुद्धा अ‍ॅलर्जी होऊ शकते. तसेच अंडे, मासे, दूध, चॉकलेट आणि इतर खाद्य पदार्थामुळे सुद्धा अ‍ॅलर्जी होऊ शकते.

अ‍ॅलर्जी आणि लक्षणे
*
मांजर, कुत्रा अशा पाळीव प्राण्यांमुळे सर्दीची अ‍ॅलर्जी होऊ शकते. यामध्ये नाकातुन आणि डोळ्यांमधून सतत पाणी येते. यासाठी जनावरापासून लांब राहा. त्यांची काळजी योग्य प्रकारे घ्या. प्राण्यांना स्वच्छ ठेवा.

* घरात वापरले जाणारे कोलिन, जुन्या कपड्यांना लागलेली धूळ यामुळे सुद्धा अ‍ॅलर्जी होऊ शकते. सर्दी होणे, सतत शिंका, असा त्रास होऊ शकतो. यासाठी घराची स्वच्छता ठेवा. जूने कपडे प्रथम उन्हात ठेवा. घरात झुरळे असल्यास पेस्ट कंटड्ढोल करा.

धुळमातीची अ‍ॅलर्जी
अ‍ॅलर्जीचे एक मुख्य कारण धुळ-माती असू शकते. या अ‍ॅलर्जीमुळे नाक वाहणे, नाकात खाज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे. खोकला, घशात खवखवणे, शिंका, सारखा खोकला येणे, अस्थमाचा अ‍ॅटॅक येणे, त्वचेवर लाल चट्टे येणे, डोळ्यांना खाज येणे, डोळे लाल होणे, ही याची लक्षणे आहेत. ही अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी घराची नियमित स्वच्छता करा. प्रत्येक ऋतुत एसीचे फिल्टर बदला. घरात लावलेल्या वॉलपेपरची साफ-सफाई करा. फरशीची साफ-सफाई, घरातील मॅटची साफ-सफाई नियमित करा.

खाद्य पदार्थांची अ‍ॅलर्जी
दूध आणि दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते. यामुळे गॅसेस, उलट्या आणि जुलाब होण्याची शक्यता असते. दुधाचे पदार्थ खाल्ल्यानंतर अशाप्रकारचा त्रास झाल्यास या पदार्थाचे सेवन करणे टाळावे.

अंडे
काहींना अंड्याचीही अ‍ॅलर्जी असू शकते. अशा व्यक्तींना अंडे खाल्ल्यावर शरीरावर रॅश आणि सूज येऊ शकते.

मासे
मासे खाल्ल्याने सुद्धा काहींना अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. यामध्ये डोळे लाल होणे, अस्थमा, तसेच नाकातून सतत पाणी वाहू शकते. तसेच गहू, मूंगफली, फळे आणि चॉकलेटचीदेखील अ‍ॅलर्जी असू शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु