श्वास घेताना आपण करतो ‘या’ सामान्य चुका,आयुष्यमान होते कमी

श्वास घेताना आपण करतो ‘या’ सामान्य चुका,आयुष्यमान होते कमी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : श्वास घेण्याच्या योग्य पध्दतीमुळे आरोग्य चांगले राहेत. श्वास घेण्याच्या पद्धतीवर तुमचे आरोग्य आवलंबून असते. श्वास आणि मानसाचे आयुष्य याचा संबंध आहे. चुकीच्या पध्दतीने किंवा अर्धवट श्वास घेतल्याने आयुष्यातील अनेक वर्ष कमी होतात, असे तज्ज्ञ सांगतात. श्वास घेतानाच्या चुका सुधारल्यास आयुष्यमान वाढू शकते. श्वास हेच जीवन आहे. एका दिवसात आपण २०,००० वेळा श्वास घेतो. हे सोपे काम असतानाही अनेक जण चुका करतात. श्वास घेताना कोणत्या चुका होतात, योग्य प्रकारे श्वास कसा घ्यावा, याविषयी जाणून घेवूयात.

वाढत्या वयासोबत जलद श्वास घेतल्याने कोशिकांपर्यंत योग्य प्रकारे ऑक्सिजन पोहोचु शकत नाही. यामुळे तणाव वाढतो. रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.८० टक्के आजार हे तणावामुळे होतात. शरीरातील व्यवस्थेला श्वासाच्या नियंत्रित करता आले तर शरीराचा प्रत्येक भाग चांगल्या प्रकारे काम करू शकतो. प्राणायाम केल्याने शरीराची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.

एका संशोधनानुसार जगातील जास्त लोक चुकीच्या पध्दतीने श्वास घेतात.मनुष्य फुफ्फूसांमध्ये श्वास भरण्याच्या क्षमतेचा फक्त ३० टक्केच उपयोग करतो. उर्वरित ७० टक्के क्षमता उपयोगात न आल्याने वाया जाते.नेहमी वर-वर श्वास घेणे ही श्वास घेण्याची चुकीची पध्दत आहे. श्वास नेहमी पोटाने घेतला पाहीजे. अशा प्रकारे श्वास घेणे फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील चांगले असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु