कोणत्या गोष्टींपासून तयार होतात बाळाचे प्रॉडक्ट्स, प्रत्येक आईने जाणून घ्यावे

कोणत्या गोष्टींपासून तयार होतात बाळाचे प्रॉडक्ट्स, प्रत्येक आईने जाणून घ्यावे

आरोग्यनामा ऑनलाईन : नवजात बाळ अतिशय नाजूक असल्याने त्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांची त्वचा कोमल आणि संवेदनशील असते. बाळाची निगा राखण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले विविध बेबी प्रॉडक्ट वापरले जातात. परंतु कोणते घटक असलेले प्रॉडक्ट बाळासाठी चांगले असतात, याविषयी तुम्हाला महिती असणे आवश्य आहे. ही माहिती आपण घेणार आहोत.

बेबी पावडर
बेबी प्रॉडक्ट्समध्ये सर्वात जास्त खरेदी केले जाणारे प्रॉडक्ट आहे बेबी पावडर. हे टाल्क नावाच्या खनिजापासून बनवले जाते. हे सर्वात सॉफ्ट मिनरल आहे.

नो मोर टिअर्स शाम्पू
बेबी शाम्पू अत्यंत माइल्ड असावा, यामध्ये कोणतेही हानिकारक केमिकल असू नये. बेबी शाम्पूमध्ये असे प्रिझर्वेटीव्ह युज करावेत जे फळ आणि भाज्यांवर आढळून येणारे मेथिलिन ग्लायसोल नामक फॉर्मलडिहायडरेटसचे पोषण देणारे असावे.

मिल्क सोप
बाळाच्या नाजूक त्वचेचा विचार करून मिल्क साबण दुधापासून तयार केला जातो. यामध्ये संरक्षित व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-इ मिसळता येते. काही सोपमध्ये मिल्क प्रोटीनसोबतच नारळाचे तेल आणि बेबी लोशनही मिसळले जाते. यामुळे त्वचेला पोषण आणि तेल मिळू शकते.

मिल्‍क लोशन
मिल्‍क लोशनमध्‍ये पाण्‍याशिवाय प्रोपीलीने ग्‍लाईकाल आणि मेरिस्टिल मिरिटेट असते. प्रोपीलीने पाण्‍याला आकर्षित करते आणि त्‍यांच्‍या संयोगाने मिल्‍क लोशन तयार होते. हे लोशन बाळाच्‍या नाजुक त्‍वचेला मुलायम आणि मऊ ठेवते.

बेबी ऑइल
नवजात बाळाची त्वचा अत्यंत नाजूक असते आणि यांच्यासाठी पातळ आणि स्वच्छ तेलाचा वापर करावा. मिनरल ऑइल आणि व्हिटॅमिन ई या तेलात असावे. एलोवेराही असू शकते. जे त्वचेला संपूर्ण पोषण देते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु