‘लाइफ सपोर्ट सिस्टीम’ म्हणजे काय ? यावर व्यक्ति जिवंत राहू शकतो ? जाणून घ्या

‘लाइफ सपोर्ट सिस्टीम’ म्हणजे काय ? यावर व्यक्ति जिवंत राहू शकतो ? जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रकृती अत्यंत नाजूक असलेल्या रूग्णाला लाइफ सपोर्ट सिस्टिम म्हणजेच जीवनरक्षक प्रणालीवर ठेवले जाते. शरीर प्रसन्नचित ठेवण्यासाठी, अवयव आणि त्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लाइफ सपोर्ट सिस्टिम आवश्यक असते. ही सिस्टिम रुग्णाला ‍जिवंत ठेवण्यासोबतच त्याला लवकर बरे करण्‍यासाठी सुद्धा उपयोगी ठरते. परंतु, यात प्रत्येक वेळी यश येईलच असे नसते. काही रुग्णांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवल्यानंतरही त्यांचे शरीर योग्य प्रतिसाद देत नाही.

केव्हा गरज भासते

१) शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी झाल्यानंतर रुग्णाला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवले जाते.
२) फुप्फुसे, निमोनिया, ड्रग ओव्हरडोस, ब्लड क्लॉट, सीओपीडी, सिस्टिक फाइब्रोसिस, हृदय अचानक बंद पडल्यानंतर ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर याची गरज भासते.

लाइफ सपोर्टची पद्धत

* प्रकृती खालवण्याचे कारण समजल्यावर रूग्णाला लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवले जाते.
* रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेऊन त्याला आधी ऑक्सिजन दिला जातो. नंतर एक ट्यूब नाक किंवा तोंडात टाकून ती इलेक्ट्रिक पंपाला जोडतात. रुग्णाला आराम मिळावा म्हणून त्याला झोपेचे औषधही दिले जाते.
* बंद पडलेले हृदय पुन्हा कार्यान्वीत करण्‍याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी सीपीआर दिला जातो. रक्त आणि ऑक्सिजन रुग्णाच्या संपूर्ण शरीरात सोडले जाते.
* यासाठी त्याला इलेक्ट्रिक शॉकही दिला जातो. यासोबत आवश्यक औषधेही दिली जातात.

केव्हा काढतात

* दोन स्थितीत रुग्णाचे सपोर्ट सिस्टिम काढण्याचे ठरवले जाते.
* पहिल्या स्थितीत, रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत असल्यास, अवयव सुरळीत काम करत असलेल्या रुग्णाचे लाइफ सपोर्ट सिस्टिम काढण्यात येते.
* दुसरे म्हणजे, रुग्‍णाच्या प्रकतीत कुठलीही सुधारणा दिसत नसल्यास.
* शरीर उपचाराला साथ देत नसल्यास नातेवाइकांच्या परवानगीने सपोर्ट सिस्टिम काढली जाते.
* शक्यतो रुग्णाच्या शेवटच्या श्वासापर्यंत उपचार सुरु ठेवले जातात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु