डायटिंग न करता ‘वजन’ कमी करायचे आहे का ? अजमावून पहा ‘या’ खास पध्दती

डायटिंग न करता ‘वजन’ कमी करायचे आहे का ? अजमावून पहा ‘या’ खास पध्दती

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन वाढले की विविध प्रकारचे आजार आपोआपच शरीरात प्रवेश करतात. सध्या चूकीचा आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब या सारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणा हे या आजारांमागील सर्वात मोठे कारण आहे. घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा नियमित वापर केल्यास वजन वाढण्याची समस्या दूर होऊ शकते. असेच काही सोपे उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

रोज उपाशीपोटी एक लहान चमचा हळद खाऊन वरून कोमट पाणी प्या.

रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीसोप टाकून ठेवा. सकाळी हे पाणी उकळून गाळून प्या.

रोज सहा ते आठ कडीपत्त्याची पाने चावून खावून त्यावर कोमट पाणी प्या.

रोज उपाशीपोटी कच्चा टोमॅटो खा.

रोज पावकिलो कोबी उकडून खा.

रोज एक आल्याचा तुकडा चोखून खा. अथवा आल्याच्या रसात मीठ टाकून खा.

रोज सकाळी नाष्टा करण्यापूर्वी एक ग्लासभर पाण्यात दोन लहान चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्या.

जेवणात जास्त प्रमाणात मिरचीचा समावेश करा.

एक ग्लास पाण्यात तीन लहान चमचे लेमन ज्यूस, मध आणि मिरपूड टाकून उपाशीपोटी घ्या.

१० एक कप गरम पाण्यात एक चमचा मध आणि एक चमचा दालचिनी पावडर मिसळून रोज सकाळ-संध्याकाळ घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु