वजन कमी करायचे आहे का? डायटिंगचा कंटाळा येतो? मग करा ‘हे’ उपाय

वजन कमी करायचे आहे का? डायटिंगचा कंटाळा येतो? मग करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  वजन वाढणे ही समस्या सध्या खुपच वाढू लागली आहे. बदलेल्या जीवनशैलीसह विविध कारणांमुळे लठ्ठपणा वाढतो. शिवाय, लठ्ठपणा वाढल्यामुळे अन्य आजारही होण्याची शक्यता वाढते. यासाठी अनेकांना वजन कमी करण्याची इच्छा असते. मात्र, यासाठी व्यायामासह डायटिंग करण्याचा कंटाळा येत असल्याने ते शक्य होत नाही. मात्र, यावरही उपाय असून हे उपाय केल्यास डायटिंग न करताही वजन कमी होऊ शकते.

करा हे उपाय

१) रोज सकाळी उपाशीपोटी एक लहान चमचा ऐलोवेरा ज्यूस, एक चमचा आवळ्याचा रस मिसळून प्या. यानंतर एक ग्लास पाणी प्या.

२) संध्याकाळी भूक लागल्यावर भरपूर पपई खा.

३) रोज सकाळी उपाशीपोटी एक छोटा चमचा हळद खावून त्यावर कोमट पाणी प्यावे.

४) रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीसोप टाकून ठेवा. सकाळी हे पाणी उकळा आणि कोमट झाल्यावर गाळून प्या.

५) रोज सकाळी उपाशीपोटी कच्चा टोमॅटो खा. यामुळे भूक नियंत्रित होऊन वजन कमी होते.

६) रोज एक अद्रकचा लहान तुकडा चोखा. अथवा एक चमचा अद्रकच्या रसात मीठ टाकून घ्या.

७) जेवणात जास्त प्रमाणात मिरचीची समावेश करा.

८) एक कप गरम पाण्यात एक लहान चमचा मध आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळून रोज सकाळ, संध्याकाळ प्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु