‘Vitamin E’ ने केसांना आणि त्वचेला ‘अशाप्रकारे’ होतो फायदा

‘Vitamin E’ ने केसांना आणि त्वचेला ‘अशाप्रकारे’ होतो फायदा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लोक आपले केस आणि त्वचा चमकत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. यानंतरही, कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येत नाही. आम्ही सांगत आहोत की आपण व्हिटॅमिन ई चा अवलंब केल्यास केस आणि त्वचेचा बराच फायदा होतो. व्हिटॅमिन ई कॅप्सूल म्हणून जवळजवळ प्रत्येक वैद्यकीय स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहे. कॅप्सूलमधील तेलामुळे चेहरा आणि केसांमध्ये छान चमक येते.

image.png

केसांमध्ये वापरा
केसांना रेशमी आणि चमकदार बनविण्यासाठी व्हिटॅमिन ई खूप प्रभावी आहे. विटमिन ई कॅप्सूलमध्ये थोडासा दही मिसळा आणि केस आणि स्काल्प त्वचेवर लावा. दहीऐवजी नारळ तेल देखील वापरु शकता.

image.png

रात्री चेहऱ्यावर लावा
रात्री झोपायच्या आधी हलक्या हातांनी व्हिटॅमिन ई आणि कोरफड जेल चेहऱ्यावर लावा. सकाळी साध्या पाण्याने धुवा याचा चेहऱ्यावर परिणान दिसून येईल.

image.png

डोळ्याखालील डाग कमी होतील
व्हिटॅमिन ई ला बदाम तेलात मिसळल्यास डोळ्याखाली डाग नष्ट होतात. रात्री झोपेच्या आधी हलक्या हातांनी डोळ्यांखालील भागाची मालिश करा, १ ते २ आठवड्यात याचा परिणाम दिसून येईल.

image.png

फाटलेल्या पायाच्या टाचांसाठी प्रभावी
जर आपण फाटलेल्या टाचांना त्रस्त असाल तर रात्री व्हिटॅमिन ईमध्ये एक चमचे पेट्रोलियम जेली (व्हॅसलीन) मिसळा आणि मोजे घाला. काही आठवडे असे केल्याने आपल्या पायाच्या टाचांमधील भेगा कमी होतील.

image.png

ओठ सुंदर बनवा
व्हिटॅमिन ई तेलात एक चमचा मध घाला आणि झोपेच्या आधी ओठांवर लावा. सुमारे २ आठवडे याचा वापर करा. तुमच्या ओठांमध्ये फरक जाणवायला लागेल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु