लसणाचे ३० चमत्कारी फायदे, फारच कमी लोकांना हे ठाऊक आहेत

लसणाचे ३० चमत्कारी फायदे, फारच कमी लोकांना हे ठाऊक आहेत
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही अपवाद वगळता भारतात प्रत्येक स्वयंपाक घरात लसूण आवर्जून वापरला जातो. काही पदार्थ तर लसणाशिवाय होऊच शकत नाहीत. हा आहारातील एक अविभाज्य घटक आहे. यामुळे चव  वाढते. तसेच याच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लसणाच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून लसूण औषधी स्वरुपात वापरण्यात येत आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व मिळतात.

हे उपाय करा

* लसणाचे सेवन कॉलेस्टॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाही.

* लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयु्क्त गूण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. ऍन्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.

* सरसूच्या तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून उकळून घ्या. हे तेल कानात टाकल्यास कान दुखण्याचा त्रास कमी होतो.

* लसणात ऍन्टी इन्फ्लामेटरी गूण आहेत. ज्यामुळे ऍलर्जीला दूर पळविता येते. लसणातील ऍन्टी आर्थीटिक गुणांमुळे डायलीसल्फाईड आणि थियासेरेमोनोने यांचे संतुलन बनून राहते. लसणाचा रस प्यायल्यानेही अनेक फायदे आहेत.

* रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणाऱ्या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गूणकारी आहे.

* थंडी किंवा बदलणाऱ्या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.
* लसूण ठेचून त्याचा रस एखाद्या काचे ग्लासच्या हेअरलाईन क्रॅकवर लावल्यास ती भरुन जाते आणि ग्लास वाचतो.

* लसणाचे नियमित सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.

* सिरोसियसच्या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्यास त्वचेला खूप आराम मिळतो आणि समस्या दूर होते.

* लसणात डायली-सल्फाईड असते. त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत होते.

* नियमित लसूण सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. ऍसिडीटी आणि गॅसेसच्या त्रासापासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो.

* दुधात लसूण उकळवून पाजल्यास लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लसणाच्या पाकळ्या भाजून खाल्यास लहान मुलांना श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो. ज्या मुलांना सर्दीचा त्रास जास्त होतो, त्यांना लसणाच्या पाकळ्यांची माळा घातली पाहिजे. त्रास कमी होतो.

* लसणाच्या सेवनाने कामोत्तेजना कायम राहते.

* शरिरातील वसा कोशिकांना नियमित करण्याची क्षमता लसणात आहे. त्यामुळे वजन कमी होते.

* गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर संपूर्ण गर्भावस्थेपर्यंत लसणाचे सेवन केले पाहिजे.

* लसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो.

* सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे.

* लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्यामुळे स्कर्वी रोगापासूनही बचाव होतो

* लसणाच्या सेवनामुळे सर्दी बरी होते. तसेच घशाचा संसर्ग दूर होतो. अस्थमासारख्या श्वसनविकारात लसूण गूणकारी आहे.

* लसणाच्या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणात अ‍ॅलिसिन तसेच सल्फरही असते. लसणाची पेस्ट डोक्याला लावल्यास केस गळणे कमी होते

* दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी. लगेच आराम मिळेल.

* लसूण, मिनरल ऑईल, पाणी आणि लिक्विड सोप एकत्र करुन नैसर्गिक किटकनाशक तयार केले जाऊ शकते.

* लसणाच्या ५ पाकळ्या बारीक करुन त्यात थोडे पाणी टाकावे. त्यात १० ग्रॅम मध मिसळावा. हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील.

* लसणाचे सेवन लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. हवामान बदलाशी संबंधित आजारांवर लसूण गूणकारी आहे. ५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लसूण अनेक आजारांवर उपायकारी सिद्ध होतो.

* लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाही. तसेच त्वचाही नितळ होते.

* तारुण्यपिटीकेवर लसणाची पाकळी लावून हलक्याने रगडल्यास लवकरच आराम मिळतो.

* लसणाच्या नियमित सेवनाने त्वचेचे आजारही बरे होतात. तळपायाच्या आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे. रिंगवर्म किंवा अ‍ॅथलिट फुट यासारख्या आजारांवर लसूण गुणकारी आहे.

* लसूण शरिरात इन्सूलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु