भाजीमध्ये ‘तिखट’ जास्त झाले ? ‘असा’ करा तिखटपणा कमी 

भाजीमध्ये ‘तिखट’ जास्त झाले ? ‘असा’ करा तिखटपणा कमी 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जेवण चविष्ट  बनवणं ही एक कला आहे. सर्व चवींचा योग्य मेळ ज्याला बसवता येतो तो त्यात पारंगत होतो.  पण अनेक वेळा जेवणात नकळत जास्त तिखट पडले तर काय करावे हे मात्र प्रत्येकाला कळेलच असे नाही. जेवणात जर तिखट अधिक झाले तर एक घास देखील घशाखाली उतरू शकत नाही. त्यामुळे अशा वेळी जेवणातील तिखटपणा कमी करण्यासाठी काय करावे हे आज आपण पाहणार आहोत .

 १. जेवणात तिखट अधिक पडल्यास भाजीमध्ये तूप टाकल्यास तिखटपणा काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

 २. भाजीमध्ये टोमॅटोचे काप करून टाकल्यास तिखटपणा कमी होतो. टोमॅटोचे काप घालण्यासाठी प्रथम हे काप तेलावर हलके भाजून घ्या.

 ३. कढी किंवा भाजीच्या रश्यामध्ये तिखट अधिक झाले तर त्यात दही, मलाई किंवा क्रीम टाकल्याने तिखट्पणा देखील कमी होईल आणि घट्टपणा देखील वाढेल.

४. डाळीच्या पीठाने देखील तिखटपणा कमी होतो. मात्र डाळीचे पीठ कच्चे न घालता थोडे भाजून मग घालावे.

 ५ .बटाट्याचे काप घातल्याने देखील तिखटपणा कमी होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु