“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – आरोग्य चांगलं राहण्यासाठी डॉक्टर अनेकांना फळ खाण्याचा सल्ला देतात. फळ तशी चांगली असतात. परंतु सध्या रासायनिक खतांच्या वापरामुळे फळ खाणे हे जरा जिकरीचे बनले आहे. कारण फळांवर मारलेल्या विविध औषधांमुळे आपलं आरोग्य धोक्यात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आता रासायनिक खते न वापरता बाजारात आणलेलं फळ हेच आपल्यासाठी योग्य असते. पण ते मिळणे आता कठीण आहे. परंतु केळीवर कोणतेही रासायनिक औषध फवारल तरी केळीच वरच कव्हर हे जाड असल्यामुळे त्या औषधाचा केळीवर विशेष फरक पडत नाही. त्यामुळे केळी खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते.

 केळी खाल्याने आरोग्यास काय फायदे होतात ते खालीलप्रमाणे 

१) केळीमध्ये अनेक पोषणमूल्य असल्यामुळे सकस आहारामध्ये त्याची गणना केली जाते. केळीत पिष्टमय पदार्थ, प्रथिने, खनिजे, अ, ब, क, ड, ई आदी. जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस असते.

२) केळीमध्ये शरीराला ऊर्जा देण्याची शक्ती व उष्मांक भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे सर्व फळांमध्ये केळे हे अधिक उष्मांक देणारे फळ आहे.

३) केळीमध्ये नैसर्गिकरित्या असणारी साखर असल्याने ती शरीराचा थकवा दूर करून उत्साह निर्माण करते.

४) केळी हे एक शक्ती देणार फळ आहे.

५) केळी हे एक थंड फळ आहे. आणि याने कफ बरा होतो.

केळी कधी खावी 

१) केळी सकाळी व रात्रीच्या वेळी खाऊ नये, कारण यामुळे कफ होण्याची शक्यता असते. तसेच सर्दी-खोकला झालेला असताना केळी खाऊ नयेत.

२) आयुर्वेदानुसार दूध आणि केळी एकत्र करून केलेले शिकरण वा फ्रुट सॅलेड खाऊ नये. कारण केळे व दूध एकत्र खाणे हा विरुद्ध आहार आहे. वारंवार ते खाल्ल्याने अनेक आजारांची लागण होऊ शकते.

३) बाजारातून केळी आणताना ती नसर्गिकरित्या पिकलेली आहेत. की नाही ते पाहावे. सहसा एकदम हिरव्या दांडय़ाची आणि दिसायला पिवळी धम्मक सोनेरी केळी घेऊ नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु