हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी करा ‘या’ पदार्थाचा वापर, अनेक आजारांवर गुणकारी

हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी करा ‘या’ पदार्थाचा वापर, अनेक आजारांवर गुणकारी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हृदयरोगाचे प्रमाण अलिकडच्या काळात खुप वाढले आहे. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी योग्य ती काळजी सर्वांनीच घेणे गरजेचे आहे. यासाठी योग्य आहार आणि व्यायाम खुप महत्वाचा आहे. घरात उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा वापर करून तुम्ही हृदयाचे आरोग्य जपू शकता. दालचिनी हा मसाल्यातील पदार्थ हृदयरोगाला दूर ठेवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

हृदयरोग
दालचिनीत अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्याने याचे रोज सेवन केल्यास शरीरात खराब कोलोस्ट्रॉल जमा होत नाहीत. यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो.

ऊर्जा
अशक्तपणा, थकवा यासाठी एक चमचा दालचिनी घेऊन ती पाण्यात उकळावी. हे पाणी चहाप्रमाणे प्यायल्यास थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते.

श्वसनाचे विकार
दालचिनीत अँटीमायक्रोबिअल गुण असल्याने याच्या सेवनाने श्वसनाचे आजार दूर होतात. दालचिनी संक्रमण तयार करणारी बुरशीदेखील नष्ट करते.

संधिवात
दालचिनीतील दाहकताविरोधी गुणांमुळे संधिवातापासून आराम मिळतो. दिवसातून एकदा कोमट पाण्यासोबत दालचिनी घ्यावी.

लठ्ठपणा
दालचिनीदेखील वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. सकाळी एक ग्लास गरम पाण्यासोबत एक चमचा दालचिनी घ्यावी.

पोटाच्या तक्रारी
रोज एक चमचा दालचिनी पावडर खाल्ल्यास त्यातील अ‍ॅँटी ऑक्सिडंट्समुळे पचनसंस्था सुधारते. सकाळी दालचिनी खाल्ल्यास अधिक फायदा होतो.

रक्ताच्या समस्या
रक्त घट्ट होणे, रक्तात गाठी होणे इत्यादी समस्या दूर करण्यासाठी रोज दालचिनी खावी. यातील नैसर्गिक घटकामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु