पिळदार शरीरासाठी ‘हे’ आवश्य खा, असा करा या पदार्थाचा वापर

पिळदार शरीरासाठी ‘हे’ आवश्य खा, असा करा या पदार्थाचा वापर

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : पिळदार शरीर हवे असल्यास जिम, योगा, योग्य आहार खुप महत्वाचा ठरतो. मसल्स बनण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. यासाठी आहारात प्रोटीनयुक्त सोयाबीनचा आवर्जून समावेश केला पाहिजे. यात प्रोटीनसह खनिज, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन ए आदी पोषक तत्व भरपूर असतात. तसेच कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयर्न आणि कॅल्शियमसारखे मिनरल्सदेखील असतात.

हे आहेत फायदे
१ यातील कॅल्शियम आणि आयर्नमुळे शरीराचा चांगला विकास होतो. त्वचा, नखे आणि केसांचे आरोग्य सुधारते.

२ स्वस्त असल्याने कुणीही सहज खरेदीही करु शकता.

३ प्रोटीन भरपूर असल्याने बॉडी बनविणाऱ्यानी सोयाबीनचे सेवन आवर्जून करावे.

४ सोया मिल्कमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, यामुळे मांसपेशी मजबूत होतात. स्किन सेल्सचे टिशूज मजबूत होतात. केस गळती थांबते.

५ कोलेस्ट्रॉलला कमी करण्याचा गुणधर्म असल्याने ह्रदयाच्या समस्या दूर होतात. ह्रदय मजबूत होते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु