कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आधुनिक विज्ञानाने धने आणि कोथिंबिरीचे विविध औषधी गुण मान्य केले आहेत. कोथिंबीरीचा वापर प्राचीन काळापासून होत आहे. कोथिंबिरीच्या रोपाला आलेले सुवासिक फळ म्हणजे धने होय. हा स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे. पावडरच्या स्वरुपातही धन्यांचा वापर केला जातो. कोथिबिरची हिरवी पाने किंवा वाळलेले बी, यांचा वापर घराघरात केला जातो. कोथिंबीरचे अनेक फायदे असून याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

हे आहेत फायदे

* धने महिलांमधील मासिक पाळीतील समस्या दूर करतात. मासिक पाळीत जास्त त्रास होत असेल तर अर्धा लिटर पाण्यामध्ये ६ ग्रॅम धने पावडर टाकून एकजीव करून घ्या, त्यानंतर यामध्ये साखर टाकून या मिश्रणाचे सेवन केल्यास लाभ होईल.

* कोथिंबीरीची पाने बारीक करून पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या. गाळलेल्या पाण्याचे काही थेंब डोळ्यामध्ये टाकल्यास डोळ्यातून पाणी येण्याची समस्या दूर होईल. तसेच कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन सी, ए, अँटीऑक्सीडेंट आणि फॉस्फरससारखे तत्व आढळून येतात. यामुळे कमजोर दृष्टीसाठी कोथिंबीर एक उत्तम औषध आहे.

* धन्यांच्या सुगंधित तेलामध्ये सिटरोनेलोल तत्व उत्तम प्रकारचे अँसेप्टिक आहे. यामुळे तोंड आल्यास किंवा तोंडामध्ये जखम झाल्यास हे तेल फायदेशीर ठरते.

* हिरव्या ताज्या कोथिंबिरीची जवळपास २० ग्रॅम पाने आणि त्यामध्ये चिमुटभर कापूर मिसळून बारीक करून रस गाळून घ्या. या रसाचे दोन थेंब नाकात टाकल्याने तसेच या रसाने माथ्यावर हलक्या हताने मालिश केल्यास नाकातून निघणारे रक्त थांबेल.

* कोथिंबीरीची पाने बारीक करून १ चमचा प्रमाणात चिमुटभर हळद मिसळून हे मिश्रण दिवसातून कमीतकमी दोन वेळेस लावल्यास मुरुमांची समस्या दूर होते.

* दोन कप पाण्यामध्ये जिरे, धने, चहापत्ती आणि थोड्या प्रमाणात बडीशेप टाकून २ मिनिट हे मिश्रण उकळून त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर आणि अद्रक टाकले जाते. गळ्याचे आजार, अपचन आणि गॅसचा त्रास असलेल्या लोकांनी या चहाचे सेवन करावे.

* कोथिंबीरीची पाने खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. यामध्ये अँटीफंगल, अँटीसेप्टिक, डिटॉक्सीफाइंग गुण असतात. शरीराला वारंवार खाज सुटण्याची समस्या असेल तर कोथिंबीर रामबाण उपाय आहे. कोथिंबीरीची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास खाजेची समस्या दूर होईल.

* बडीसोप, थोडीशी खडीसाखर, धने पावडर एकसमान प्रमाणात घेऊन याचे चूर्ण तयार करून ६-६ ग्रॅम दररोज जेवण केल्यानंतर खाल्ल्यास हात-पायांची डोळ्यांची जळजळ, अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी दूर होते.

* हिरवी ताजी कोथिंबीर पाचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. कोथिंबीरीची हिरवी पाने पित्तनाशक असतात. पित्त किंवा कफाचा त्रास असेल तर कोथिंबीरीचा दोन चमचे रस सेवन केल्यास आराम मिळेल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु