बद्धकोष्ठता आणि वजन कमी करण्यासाठी मनुका लाभदायक, ‘हे’ आहेत 5 फायदे, जाणुन घ्या

बद्धकोष्ठता आणि वजन कमी करण्यासाठी मनुका लाभदायक, ‘हे’ आहेत 5 फायदे, जाणुन घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थंडीच्या दिवसात शरीर आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. याकाळात काही सुकामेव्याचे नियमित सेवन केल्यास आजारपणापासून बचाव होतो, तसेच शरीरात उष्णता राखली जाते. मनुकेसुद्धा थंडीच्या दिवसात लाभदायक ठरतात. मनुका आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. थंडीत याचे सेवन केल्यास अनेक आजार दूर राहतात. यात आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर असते. याच्या सेवनाने कोणते फायदे होतात हे जाणून घेवूयात.

१. बद्धकोष्ठता
मनुका खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. बद्धकोष्ठतेवर हा रामबाण उपाय आहे. मनुके भिजवून खाल्ल्याने जास्त फायदा होतो.

२. ताकद वाढते
रात्री मनुके भिजवून ते सकाळी त्याचे पाणी व मनुके खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते. यातील नैसर्गिक साखरेचे सहज पचन होते. यामुळे शरीराला तात्काळ उर्जा मिळते. हृदयरोगाच्या रूग्णांसाठी हे लाभदायक आहे.

३. हाडे मजबूत होतात
चुकीच्या सवयींमुळे हाडे कमजोर होण्याचे प्रमाण वाढले आहे. मनुक्याचे नियमित सेवन केल्यास हाडे मजबूत होतात. यात कॅल्शियमची मात्रा भरपूर असते. स्मरणशक्तीसाठी सुद्धा मनुका लाभदायक आहे

४. रक्ताची कमतरता होते दूर
मनुक्यात योग्य प्रमाणात आयर्न असते. रक्तनिर्मितीसाठी शरीराला व्हिटॅमिन बी ची आवश्यकता असते. मनुक्यात हे भरपूर असते. यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.

५. वजन कमी होते
वजन कमी करण्यासाठी मनुका फायदेशीर आहे. यातील नैसर्गिक साखर शरीराचे नुकसान करत नाही. याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु