माणसांच्या रूग्णालयात कॅन्सरग्रस्त सिंहावर उपचार

माणसांच्या रूग्णालयात कॅन्सरग्रस्त सिंहावर उपचार

आरोग्यनामा ऑनलाईन टिम- कॅन्सरग्रस्त एका सिंहावर माणसांच्या रूग्णालयात उपचार केल्याचे प्रकार दक्षिण आफ्रिकेत घडला आहे. येथील एका खासगी रूग्णालयात दाखल झालेल्या या सिंहाला मनुष्यांना दिली जाणारी रेडीएशन थेरपी देण्यात आली. येथील रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरू नयेत यासाठी मागच्या दाराने सिंहाला ऑपरेशन थिएटरमध्ये आणण्यात आले. पाच मिनिटे या ठीकाणी ही थेरपी देण्यात आली. १६ वर्षाच्या या सिंहाचे वजन २६० किलो ग्रॅम आहे.

उत्तर-पूर्व दक्षिण आफ्रिकेच्या प्रेटोरिया येथील मुएलमेड मेडिक्लिनीकमध्ये या सिंहाला ही थेरपी देण्यात आली. यावेळी त्याच्या तोंडावर पट्टी बांधण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेत जनावरांसाठी रेडिएन क्लीनिक नसल्याने त्याला बेशुद्ध करून खासगी रूग्णालयात आणले होते. येथीलसहा तज्ज्ञांच्या टीमने सिंहावर उपचार केले. यात पाच रेडिओथेरपिस्ट आणि एक ऑन्कोलॉजिस्टचा समावेश होता. सिंहाच्या नाकावरील जखमांवर उपचार करण्यात आला.

त्यानंतर त्याच्या डोळ्यांवर आणि नाकाच्या भागाला बँडेज बांधण्यात आले. जेणेकरून पाच मिनिटे चालणाऱ्या उपचारावेळी सुरक्षा असावी. या सिंहावर रेडिओथेरपी उपचाराचे पाच सेशन होणार आहेत. हा सिंह प्रेटोरियापासून १८ किमी दूर लॉरी पार्क अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड ओल सॅन्चुरीमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वीच त्याच्या शरीराव जखमा आढळल्या. बायोप्सी केल्यानंतर त्याला कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु