‘हायपर टेन्शन’ वर वेळीच करा इलाज, अन्यथा किडनी होते निकामी, ‘हार्ट अटॅक’ चाही धोका !

‘हायपर टेन्शन’ वर वेळीच करा इलाज, अन्यथा किडनी होते निकामी, ‘हार्ट अटॅक’ चाही धोका !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटात मानसिक ताणतणाव नेहमीच दिसून येतो. हा ताणतणाव कधी-कधी हापर टेन्शनपर्यंत पोहचतो आणि मोठी समस्या निर्माण होते. हायपर टेन्शनकडे वेळीच लक्ष दिले नाही तरी त्याचा परिणाम शरीरातील महत्वाच्या अवयवांवर होऊ शकतो. यामुळे संपूर्ण शरीरसुद्धा डॅमेज होऊ शकते, असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे.

हायपर टेन्शनचे परिणाम

१) हृदयापासून संपूर्ण शरीरभर ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्ताचा पुरवठा करत असलेल्या नसांमध्ये बिघाड होतो.
२) हृदयविकार होऊ शकतो.
३) अनेक आजार होऊ शकतात.
४) यामुळे किडनीवर दाब येऊन ती डॅमेज होऊ शकते.
५) हार्ट अटॅकही येऊ शकतो.

हे लक्षात ठेवा

* ब्लड प्रेशरची किमान पातळी योग्य असेल, पण कमाल पातळी जर १२० वरुन १४० वर गेली तर सावधान व्हावे.

* १८ ते ४९ वयातील स्त्री, पुरुषांनी हायपर टेन्शनकडे दुर्लक्ष करू नये. ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे.

* याचे धोके टाळण्यासाठी जीवनशैली बदलावी. अन्यथा, हायपर टेन्शन संपूर्ण शरीरावर वाईट प्रभाव पाडू शकते. यामुळे अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु