परिपूर्ण ‘आहारासाठी’ खूपच काटेकोरपणा चांगला नाही

परिपूर्ण ‘आहारासाठी’ खूपच काटेकोरपणा चांगला नाही

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्यदायी आहार घेणे चांगले असले तरी नेहमीच परिपूर्ण खाद्यपदार्थ सेवन करण्याचे काटेकोरपणे पालन करण्याची सवयही चांगली नाही, असे द फ्लेक्टॅरिअन डाएटचे लेखक डाऊन जॅक्सन ब्लॅटनर यांनी म्हटले आहे. नियमित परिपूर्ण आहार घेतल्यानंतरही शरीराला विशेष लाभ होत नसल्यास त्याचे कारण शोधणे खूप महत्वाचे आहे. आपण परिपूर्ण आहार घेतो का हे शोधण्यासाठी तज्ज्ञांनी एक प्रश्नावली तयार केली असून तिची उत्तरे शोधावी लागतील. या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर आपण परिपूर्ण अन्नग्रहणकर्ते आहोत, असे समजण्यास हरकत नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

आहारनियमन कार्यक्रमाच्या उलट तुम्ही कमी भोजन करण्याची सवय नियमित करण्याचा वेगाने प्रयत्न करत आहात ? गतवेळचा आहारनियमन कार्यक्रम अयशस्वी होण्याचे कारण तुमची इच्छाशक्ती कमकुवत होणे हे आहे काय ? तुम्ही कोणताही आहारनियमन कार्यक्रम सोमवारी सुरू करता ? कोणताही पदार्थ पाहून तुम्ही चांगला वा वाईट या शब्दांचा वापर करता ? तुम्हाला भोजन करण्याची तीव्र इच्छा होते ? तुम्ही आहार योजनेतून तुमचे आवडते पदार्थ वगळले आहेत ? अनारोग्यकारक पदार्थ निवडल्यानंतर तुम्ही ते खात नाहीत ? तज्ज्ञांच्या मते, हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर वजनात घट होईलच याची हमी देता येत नाही.

अनेक जण कमी अवधीत लवकर वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात. वजन घटवण्यासाठी उपाशी न राहता आहारात निश्चित उष्मांकांचा समावेश करणे गरजेचे आहे. भोजनात कमी उष्मांक घेण्यासोबतच भरपूर पालेभाज्या व फळांचे सेवन केल्यास शरीराची ऊर्जापातळी दिवसभर कायम राहील. अतिखाण्यापासूनही बचाव होतो. दिवसातून तीनदा जेवण करावे आणि दोन वेळा स्नॅक्स खावे. भोजन केल्यानंतरही तुम्हाला भूक लागत असेल तर तुम्ही आहारनियमन योजना व्यवस्थित केली नाही, असे समजावे. भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कधीही आवडत्या खाद्यपदार्थांपासून दूर राहू नये. दररोजच्या खाण्यात अनेक गोष्टींचा समावेश असतो. मात्र, नियमानुसार त्याचे पालन होईलच असे नाही. पोटात थोडीशी रिकामी जागा असणेही गरजेचे आहे. अतिखाण्यापासून वाचण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आवडता पदार्थ एखाद्या विशेष प्रसंगी खावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु