ऊर्जावान राहण्यासाठी खावेत ‘हे’ ७ पदार्थ, आजार राहतील दूर

ऊर्जावान राहण्यासाठी खावेत ‘हे’ ७ पदार्थ, आजार राहतील दूर

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळा आणि हिवाळ्यात हवामान बदलत असल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत असतात. या काळात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. तसेच योग्य आहार घेणे सुद्धा खुप जरूरी असते. सर्दी, खोकला, ताप या आजारांना दूर ठेवण्यासाठी काही खास पदार्थांचे सेवन या काळात आवश्य करावे. या थंड हवामानात शरीरातील उर्जा टिकवण्यासाठी आणि आजार दूर ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

अद्रक
सर्दी, खोकला आणि तापासाठी अद्रक टाकून तयार केलेला चहा हे सर्वोत्तम औषध आहे. अद्रकचे पाणीही प्यावे. कापलेले २ चमचे अद्रक ५-१० मिनिटांसाठी पाण्यात उकळून घ्यावे. ते थंड करून प्यावे.

गरम सूप
हे नैसर्गिक पेनिसिलिन आहे. गरम सूपमध्ये सर्वाधिक उपचार क्षमता असते. गरम-गरम चिकन सूप प्यायल्यास गळा स्वच्छ होतो. तर शोरबामुळे ऊर्जा वाढते. त्याची शक्ती वाढवण्यासाठी त्यासोबत कांदा आणि लसूण यासह भाज्यांचा वापर केला जातो.

लसूण
लसणामध्ये अँलिन नावाचे फ्लेवरिंग द्रव्य असते. सर्दी खोकल्यावर उपाय म्हणून याचा वापर केला जातो. तसेच ते अँटिऑक्सिडंटचे कामही करते.

विविध पेये
कॉफी, चहा किंवा इतर पेय पिण्याऐवजी भरपूर प्रमाणात पाणी आणि फळांचा रस घ्यावा. हर्बल टी अथवा गरम पाण्यात लिंबू पाणी घेऊ शकता.

आंबट फळे
व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी आंबट फळे खाऊ शकता. नाष्ट्यामध्ये संत्रीचा ज्यूस प्यावा. किंवा द्राक्षे खाऊ शकता.

व्हिटॅमिन सी
लिंबू, संत्री यासह बटाटा, शिमला मिरची, स्टड्ढॉबेरी आणि अननस यातूनही मोठय़ा प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. रोजच्या अन्नात याचा समावेश असल्यास सर्दी खोकल्याचा प्रतिकार केला जाऊ शकतो.

मसालेदार पदार्थ
काही लोक सर्दी, खोकल्यापासून दूर राहण्यासाठी लसूण, हर्स रेडीश, मिर्ची किंवा मसालेदार सॉसही खातात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु