आरोग्य जपण्यासाठी स्वयंपाक घरातून काढून टाका ‘या’ ७ वस्तू !

आरोग्य जपण्यासाठी स्वयंपाक घरातून  काढून टाका ‘या’ ७ वस्तू !
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या स्वयंपाक घरात आपण कधी कळत तर कधी न कळत असे भांडे ठेवतो ज्याने आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. चला जाणून घेऊ अशा ७ भांड्यांबद्दल जे स्वयंपाक घरातून काढून टाकावे.

– प्लॅस्टिकची बाटली तर प्रत्येकांच्या स्वयंपाक घरात असते. पण अशा या प्लॅस्टिकच्या बाटलीत बिस्फेनॉल ए हा घटक असतो. जो शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी करतो. यामुळे प्लॅस्टिकच्या बाटलीचा वापर टाळावा.

आरोग्य जपण्यासाठी स्वयंपाक घरातून  काढून टाका ‘या’ ७ वस्तू !

– रिफाईन्ड तेल सर्रास प्रत्येक स्वयंपाक घरात वापरले जाते. पण या रिफाईन्ड तेलामध्ये मोठ्या प्रमाणात ऍसिडचा वापर होतो. या तेलातील वास काढून टाकण्यासाठी हेक्सानॉलचा वापर होतो. या तेलामुळे कॅन्सरचा धोका असतो. रिफाईन्ड तेलाच्या ऐवजी तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करावा.

आरोग्य जपण्यासाठी स्वयंपाक घरातून  काढून टाका ‘या’ ७ वस्तू !
– आजकाल प्रत्येकांच्या स्वयंपाक घरात नॉन स्टिकच्या भांडयांनी जागा घेतली आहे. पण जास्त तापमानावर या तव्यांचा वापर केल्यास पीएफसी कोटिंगला धक्का बसतो. कोटिंगचे तुकडे पोटात गेल्यास यकृताला धोका निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी लोखंडी भांडी वापरा.
आरोग्य जपण्यासाठी स्वयंपाक घरातून  काढून टाका ‘या’ ७ वस्तू !
– अन्न पदार्थ जास्त काळा पर्यंत गरम राहण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा वापर केला जातो. नियमित अ‍ॅल्युमिनियम फॉईलमधील पदार्थ खाल्ल्यानं २ ते ५ ग्रॅम अ‍ॅल्युमिनियम फॉईल पोटात जाते. जास्तीत जास्त ५० मिलिग्रॅम अ‍ॅल्युमिनियम गेल्यास धोका नसतो. यापेक्षा जास्त प्रमाणात जर अ‍ॅल्युमिनियम फॉईल शरीरात गेला तर याचा मेंदूवर आणि हाडांवर परिणाम होतो. अशा या अ‍ॅल्युमिनियम फॉईलच्या ऐवजी तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता.
आरोग्य जपण्यासाठी स्वयंपाक घरातून  काढून टाका ‘या’ ७ वस्तू !

– अनेकदा आपला आवडता मग, कप किंवा एखादी  भांडी  आवडीचा असल्याने आपण तो फुटला तरी  त्याला टाकून न देता त्याला चिटकवून आपण ते पून्हा वापरतो. पण यामुळे अशा प्रकारचे भांडे व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत. आणि त्यात  किटाणू राहतात. म्हणून असे भांडे वापरणे टाळा.

आरोग्य जपण्यासाठी स्वयंपाक घरातून  काढून टाका ‘या’ ७ वस्तू !

– प्लास्टिक चॉपिंग बोर्डचा वापर आजच्या स्वयंपाक घरात केला जातो. पण या अशा प्लास्टिक चॉपिंग बोर्ड ओल्या असल्यास त्यावर किटाणू असल्याची शक्यता असते तसेच त्यातील प्लास्टिकचे तुकडेही पोटात जाऊ शकतात. म्हणून अशा  चॉपिंग बोर्ड ऐवजी तुम्ही लाकडी  चॉपिंग बोर्डचा वापर करू शकता.

आरोग्य जपण्यासाठी स्वयंपाक घरातून  काढून टाका ‘या’ ७ वस्तू !

-अ‍ॅल्युमिनियम भांडीचा नियमित सेवन केल्याने किडनी आणि फुफ्फुसांवर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून अशा भांड्यांचा वापर टाळणे योग्य.

आरोग्य जपण्यासाठी स्वयंपाक घरातून  काढून टाका ‘या’ ७ वस्तू !

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु