मासिक पाळीतील त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

मासिक पाळीतील त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मासिक पाळीत काही महिलांना त्रास होतो. या त्रासामुळे ते दिवस खूपच त्रासदायक ठरतात. अशावेळी त्रस्त न होता काही घरगुती उपचार केल्यास चांगला परिणाम दिसून येतो. मासिक पाळी जवळ येताच कंबर, पोट, पाय दुखण्याचा त्रास महिलांना सुरु होतो. पीएमएसमध्ये मासिक चक्रातील एक ते दीड आठवड्यापूर्वीच त्रास सुरु होतो. घरगुती उपचार केल्यास या त्रासातूनही मुक्ती मिळू शकते.

हे आहेत रामबाण उपाय

* कडूनिंबाची ८ ते १० कोवळी पाने बारीक कुटून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट कोमट पाण्यासोबत प्राशन करा. कडूनिंबाची पाने उपलब्ध नसतील तर तुळशीच्या पानांचा उपयोग करू शकता. एक कप पाण्यामध्ये तुळशीचे पानं उकळून घ्या. मासिक पाळीमध्ये प्रत्यक दोन तासाला हे पाणी प्यावे. पाणी कोमट असावे, थंड झालेले पाणी पिऊ नये.

* कोरफडीच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळेस घेतल्यास आराम मिळेल. रक्तस्त्राव सामान्य राहतो.

* अद्रकाचा छोटासा तुकडा बारीक करून घ्या. एक पाण्यामध्ये बारीक केलेले अद्रक पाच मिनिट उकळून गाळून घ्या. त्यानंतर यामध्ये एक चमचा मध आणि चवीनुसार लिंबाचा रस मिसळून घ्या. चहाऐवजी या मिश्रणाचे सेवन करा.

* एक कप पाण्यामध्ये एक चमचा ओवा उकळून घ्या. पाच मिनिट उकळल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून प्या. पाणी उकळून घेणे शक्य नसेल तर अर्धा चमचा ओवा तोंडातून टाकून कोमट पाणी प्यावे. भाजलेला ओवा एक कप गरम दुधासोबत घेतल्यास आराम मिळेल.

* एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप टाकून पाच मिनिटे उकळून घ्या. पाणी कोमट झाल्यानंतर बडीशेप बारीक करून पाणी गाळून घ्या. त्यानंतर यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्या. मासिक पाळीच्या तीन दिवसांपूर्वी दररोज दोन वेळेला हे मिश्रण पाण्यातून घ्यावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु