सौंदर्य वाढविण्यासाठी ‘हे’ तेल आहे गुणकारी, अशा पद्धतीने करा वापर

सौंदर्य वाढविण्यासाठी ‘हे’ तेल आहे गुणकारी, अशा पद्धतीने करा वापर

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मसाल्यातील लवंग ही अतिशय गुणकारी आहे. यातील औषधी गुणधर्मामुळे अनेक आजार बरे होऊ शकतात. खाद्यपदार्थांचा स्वाद वाढविणारी लवंग आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तेवढीच लाभदायक असल्याने तिचा वापर विविध औषधांमध्ये केला जातो. आयुर्वेदामध्ये लवंगेला खुप महत्व आहे. विविध आजारांसह सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर सुद्धा लवंग तेल गुणकारी आहे. सौंदर्य वाढविण्यासाठी सुद्धा हे लाभदायक आहे.

हे आहेत फायदे

१) केस पांढरे होणे, केस गळणे आदी समस्यांवर लवंग तेल लाभदायक आहे. नारळाच्या तेलात लवंगाचे तेल मिसळून लावावे. केवळ लवंग तेल केसांना लावणे नुकसानकारक ठरु शकते.

२) यातील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणांमुळे अनेक त्वचाविकार बरे होतात.

३) लवंग तेलाचा वापर मुरुमांच्या डागांवर नियमित केल्यास डाग जातात.

४) लवंगाच्या तेलाने रोज रात्री झोपताना मसाज केल्यास त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु