सतत बसून राहण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी करा ‘हे’ ११ उपाय

सतत बसून राहण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी करा ‘हे’ ११ उपाय

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  सतत बसून राहिल्याने कधीही बरा न होणारा आजार होण्याची शक्यता असते. रोज अकरा तास किंवा त्यापेक्षा जास्तवेळ बसत असल्यास मृत्यूची शक्यता ४० टक्के अधिक वाढते. सुमारे ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोक पायावर उभेच राहत नाहीत. हे लोक एकतर १८ तास बसलेले असतात नाहीतर झोपलेले. सतत बसण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेवूयात.

हे उपाय करा
१ दोन तास बसण्यापेक्षा उभे राहील्यास ब्लड शुगर कोलेस्टेरॉल लेव्हलमध्ये सुधारणा होते.
२ बसण्यापेक्षा चालण्याने कमरेचा वाढलेला घेर कमी होऊ शकतो.
३ रोज उभे राहिल्यास ब्लडमध्ये वाढलेला फॅट्सचा स्तरही ११ टक्के कमी होतो.
४ उभे राहिल्याने हार्ट बीट रेट साधारण दहा बीट प्रति मिनिटे वाढतो. ज्यामुळे प्रति तासात ६० कॅलरीज बर्न होतात.
५ प्रत्येक तासाला केवळ पाच मिनिटे काहीही न करता उभे राहिल्याने आणि चालण्याने एका महिन्यात २ हजार ५०० पेक्षा जास्त कॅलरी बर्न केल्या जाऊ शकतात.
६ बागेत किंवा अंगणात पाईपने पाणी देण्याऐवजी कॅनने पाणी द्या.
७ टीव्ही उभ्याने बघा.
८ ऑफिसला जाताना बस अथवा लोकलमध्ये उभे रहा.
९ जास्त पाणी प्या. यामुळे सतत लघवीसाठी जागेवरुन उठावे लागेल.
१० फोन कॉल आला तर बोलण्यासाठी उभे राहा.
११ स्टँडींग डेस्क वारा. हा उंचीनुसार अ‍ॅडजस्ट करता येतो. उभे राहून थकलात तर खुर्ची घेऊन बसा. एका तासात केवळ १० मिनिटे उभे राहण्याची गरज आहे.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु