पोटाचा घेर वाढण्याची ‘ही’ प्रमुख कारणे, वेळीच करा उपाय

पोटाचा घेर वाढण्याची ‘ही’ प्रमुख कारणे, वेळीच करा उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दिवसभर बैठे काम, घरात आणि बाहेर जंकफूड आणि शितपेय घेणे, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार आदी कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या सध्या वाढत चालली आहे. लठ्ठपणामुळे पोटाचा घेर वाढणे साहजिकच आहे. लठ्ठपणा हा एका दिवसात येत नाही. ही प्रक्रिया हळूहळू होते. याची कारणे जाणून घेतली तर लठ्ठपणाची समस्या दूर करता येऊ शकते.

ही आहेत ५ कारणे

१) बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआयकडे दुर्लक्ष करू नका. वजन, वय आणि उंची यानुसार बीएमआय ठरतो. तो २५ ते ३० च्या दरम्यान असेल, तर तुम्ही लठ्ठ आहात आणि ३० च्या पुढे गेला असेल तर अतिलठ्ठ आहात.

२) लठ्ठपणा हळूहळू वाढतो. त्यामुळे तो कमी होताना सुद्धा ताबडतोब कमी होणार नाही. पोटाचा घेर कमी करण्यासाठी नियोजन करा. सुरुवात करा.

३) बैठे काम करत असाल तर अधून मधून फेरफटका मारा. नियमित व्यायाम करा.

४) बाहेरचे पदार्थ खाऊ नका. जंकफूड, शितपेय टाळा.

५) दररोज चालण्यासाठी बाहेर पडा. किमान तीस मिनिटे तरी चाला.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु