कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जगभरात लठ्ठपणा ही एक समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. लठ्ठपणा हा एक आजार असल्याचे तज्ज्ञ मानतात. सध्या प्रत्येक व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. लठ्ठपणामुळे डायबिटीज, हायब्लडप्रेशर सारखे आजार वाढत आहेत. यासमस्येवर हर्बल उपाय जास्त परिणामकारक असल्याचे दिसून येत आहे. हे उपाय करुन शरिराची चरबी कमी करता येते. यासाठी जीवनशैलीतही काही बदल करणे गरजेचे आहे.

हे आहेत उपाय

* सुंठ, दालचिनी, आणि काळी मिरी प्रत्येकी ३ग्रॅम एकत्र करुन त्याची बारीक पूड करावी. त्याचे दोन भाग करून पाण्यासोबत सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा घ्यावी.

* ताजी पत्ताकोबी बारिक करुन तिचा रस काढून रोज सकाळी घ्यावा. यामुळे चरबी कमी होते. पत्ता कोबी साखर आणि इतर कार्बोहाइड्रेटसची चरबी होऊ देत नाही. यामुळे वजन वाढत नाही.

* अर्धा चमचा सोप एक कप उकळत्या पाण्यात टाकून १० मिनिटे उकळून हे पाणी थंड करून प्यावे. सलग तिन महीने हे पाणी प्यायल्यास वजन कमी होते.

* पुदीन्याची हिरवी चटणी पोळीसोबत खाणे लाभदायक आहे. पुदिना चहात टाकून घेतल्यानेही फायदा होतो. हिरडा किंवा बेहडा फळाचे चुर्ण एक-एक चमचा ५० ग्रॅम पडवळाच्या रसासोबत १ ग्लास पाण्यातून घेतल्याने वजन जलद कमी होते. थकवाही दूर होतो.

* कारल्याची अर्धवट कच्ची भाजी खाल्ल्याने वजन कमी होते. शेवग्याची भाजी वजन कमी कराण्यासाठी प्रभावी आहे.

* गुगुळ डिंक पाण्यातून दिवसातून दोनदा घेतल्याने वजन कमी होते.

* गाजराचे भरपूर सेवन वजन कमी होते, असे तज्ज्ञ सांगतात.

* सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घ्यावे. याच मिश्रणात एक चमच लिंबू रस टाकून घेता येते. तसेच लिंबू पाणी आणि मध पिऊन दिवसभर उपवास करणे हा प्रभावी देशी उपाय आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु