ऑफिसाला जाणाऱ्यांनी पावसाळ्यात स्वतःची अशी काळजी घ्या

ऑफिसाला जाणाऱ्यांनी पावसाळ्यात स्वतःची अशी काळजी घ्या

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – मान्सून सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषीत पाण्याने आजार पसरतात. ऐन पावसाळ्यात ऊन तापत असल्याने ‘मे’ हीट सदृश्य परिस्थितीने शरीराची लाहीलाही होते. त्यासाठी पावसाळ्यात खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. आणि दररोज कामासाठी जाणाऱ्यांनी तर आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

ऑफिसला जाणाऱ्यांनी पावसाळ्यात घ्या हि काळजी

१) जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे.

२) कोल्ड ड्रिंकचा मोह टाळा.

३) हलके व पौष्टिक जेवण घ्यावे.

४) या दिवसात पालक, मुळा, कांदे व लसूण खाणे टाळावे.

५) या दिवसात सुका मेवा कमी प्रमाणात खावा.

६) आपल्या जेवणात फळे, सलाड व ज्यूस यांचा सहभाग असावा.

७) बाहेरचे उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

८) ऑफिसला जाताना बॅगमध्ये एक्सट्रा ड्रेस आणि टॉवेल ठेवा.

९) एक प्लॅस्टीकची बॅग ठेवा. जेणेकरून तुमचा मोबाईल, पैशांचं पाकिट, पास भिजणार नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु