‘त्या’ गर्भनिरोधक गोळ्या मेंदूसाठी धोकादायक, असे होते नुकसान

‘त्या’ गर्भनिरोधक गोळ्या मेंदूसाठी धोकादायक, असे होते नुकसान

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गर्भधारणा होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी आणि बर्‍याच वेळा अवांछित गर्भधारणेपासून मुक्त होण्यासाठी महिला गर्भनिरोधक गोळ्या खातात. परंतु तुम्हाला माहित आहे का? की गर्भनिरोधक गोळ्या खाणे तुमच्या मेंदूला धोकादायक ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, 10 कोटीपेक्षा अधिक महिला दररोज गर्भनिरोधक गोळ्या वापरतात. परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनात असे सूचित केले गेले आहे की, या औषधांचे सतत सेवन केल्याने तुमचा मेंदू लहान होतो.

स्वभावामध्ये येतो चिडचिडेपणा
लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात 90  महिलांना समील केले होते, जे सतत गर्भनिरोधक गोळ्या घेत होत्या. संशोधनात असे दिसून आले आहे की या औषधांचा सर्वात नकारात्मक प्रभाव मेंदूतल्या दोन भागांवर दिसून आला आहे. हे दोन्ही भाग व्यक्तीतील भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात
याचा अर्थ असा की, दीर्घकाळ स्त्रिया गर्भनिरोधक वापरतात. त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणाची शक्यता अधिक वाढतो.

याचे जास्त सेवन केल्याने नैराश्याचा धोका

याशिवाय दुसर्‍या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, गर्भनिरोधक औषधांचा जास्त प्रमाणात वापर केल्यास रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढते. जे कधीकधी धोकादायक ठरू शकते. यामुळे महिलांमध्ये नैराश्य, तणाव यासारखे लक्षणे बर्‍याच वेळा वाढत जाते. नैराश्य ही एक गंभीर मानसिक समस्या आहे.

गर्भनिरोधक औषधे आणि अधिक धोकादायक

एमरजेन्सीमध्ये गर्भनिरोधक औषधे बाजारात उपलब्ध आहेत. हे सेक्स करण्याच्या 48-72 तासांच्या आत खाल्ल्याने गर्भधारणेचे धोके कमी करतात. आकडेवारी पाहिली तर, 18-30 वयोगटातील स्त्रिया या गोळ्या जास्त वापरत नाहीत.
संशोधनात असे दिसून आले आहे की, ही औषधे दररोज घेतल्या गेलेल्या औषधांपेक्षा 6 पट जास्त धोकादायक आहेत.

महिलांमध्ये वंध्यत्व असू शकते

आपत्कालीन गर्भनिरोधक औषधे स्त्रीच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल करतात. याव्यतिरिक्त, ही औषधे पूर्णपणे सुरक्षित मानली जात नाहीत. जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये वंध्यत्व देखील केले जाऊ शकते. शिवाय गर्भाशयाच्या कर्करोगाचा, किडनीचा कर्करोग आणि आतड्यांसंबंधी कर्करोग होण्याचा धोका देखील खूप जास्त आहे. गर्भधारणा  रोखण्याचा कंडोम हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु