विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी चीनची ‘ही’ सोपी उपचार पद्धत

विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी चीनची ‘ही’ सोपी उपचार पद्धत

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंबाबत लोकांचे वादग्रस्त मत असले तरी चीनमधील वैद्यकीय उपचार पद्धती जगभरात प्रसिद्ध आहेत. चांगल्या आरोग्यासाठी चीनमध्ये वापरण्यात येणारी एक्यूपंक्चर आणि एक्युप्रेशर ही उपचार पद्धती उत्कृष्ट मानली जाते.या उपचार पध्दतीसाठी वेळ लागत असला तरी यापासून साइड इफेक्टची भिती नसते. भारतात  या उपचार पद्धतीला मोठा प्रतिसाद मिळाला नसला तरी चीनसह जगातील अनेक देशात ही उपचार पद्धती अवलंबली जात आहे. आलीकडे भारतात सुद्धा आजारावर उपचार करण्यासाठी चीनची एक्यूपंक्चर पध्दत वापरली जात आहे.

एक्युपंक्चर पद्धती 
एक्युप्रेशर आणि एक्युपंचर यामध्ये येणारा एक्यु हा शब्द चीनी भाषेतील आहे. एक्यु या शब्दाचा अर्थ पॉइंट असा आहे. शरीराच्या काही महत्वाच्या पॉइंटवर सुईने टोचून केलेल्या उपचार पध्दतीला एक्युपंक्चर म्हटले जाते.

एक्युप्रेशर पद्धती 
शरीराच्या विशिष्ट पॉइंटवर हाताने किंवा एखाद्या वस्तुने दाबून केलेल्या उपचार पद्धतीला एक्युप्रेशर पद्धती म्हणून ओळखले जाते. हात आणि पायाच्या पॉइंटला दाबून केलेल्या पध्दतीला रिफ्लेक्सॉलजी म्हणतात. मसाजच्या माध्यमातून शरीराचे पॉइंट दाबण्याच्या पद्धतीला शियात्सु म्हणतात. या पद्धतीचा योग्य वापर केला तर आजारा बरा करण्यासाठीचा खर्च देखील कमी असतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु