पुरुष आणि महिलांच्या समस्यांवर ‘ही’ डाळ आहे रामबाण, जाणून घ्या फायदे

पुरुष आणि महिलांच्या समस्यांवर ‘ही’ डाळ आहे रामबाण, जाणून घ्या फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्मर्प काउंट कमी असणे, महिलांना मासिक पाळीत त्रास होणे, सर्दी, हिवतापात, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, पचनशक्ती बिघडणे, आम्लपित्त, अजिर्ण, किडनी स्टोन, आदी समस्यांवर कुळीथ डाळ रामबाण औषध आहे. या डाळीत भरपूर पोषकतत्व असून ती पचायलाही हलकी असते. मात्र गरोदर, कुष्ठरोगी आणि ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांनी या डाळीचे सेवन करु नये. या डाळीच्या सेवनाने होणारे फायदे आणि उपाय याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

असे करा उपाय

१) जर पोटात गॅस होत असेल तर या डाळीचे सेवन करावे. यामुळे पचनशक्ती सुधारते.

२) मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रोज या डाळीचे सेवन केल्यास रक्तातील शर्करा संतुलित राहते. मधुमेहावर हा रामबाण उपाय आहे.

३) यातील फायबरमुळे आम्लपित्त, अजिर्ण आदी समस्या दूर होतात.

४) यातील विटॅमिन ए मुळे किडनी स्टोनपासूनही मुक्तता मिळते.

५) पुरूषांनी या डाळीचे नियमित सेवन केल्यास यातील फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, अ‍ॅमिनो अ‍ॅसिडमुळे स्मर्प काउंट वाढतो.

६) मासिक पाळीत जास्त ब्लीडिंग होणे, अनियमित पाळी, अशा समस्या असल्यास अशा महिलांनी या डाळीचे सेवन करावे.

७) सर्दी आणि हिवतापात या डाळीचे सूप प्यावे. यामुळे नाक मोकळे होते. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु