केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – वय जास्त झालं कि केस पांढरे होणं हा नैसर्गिक नियम आहे. परंतु सध्या कृत्रिम संसाधनाच्या वापरामुळे अगदी १५ ते १६ वर्ष वयातील मुलामुलींचे केस पांढरे झालेले आपण पाहतो. हे पांढरे केस आपल्याला नको असतात. त्यामुळे आपण केस काळे करण्यसाठी नवनवीन उपाय शोधत असतो. केस काळे करण्यसाठी अनेक कृत्रिम उपाय बाजारात उपलब्ध आहेत. परंतु ,या कृत्रिम संसाधनाचे अनेक साइड इफेक्ट होतात. त्यामुळे आपण केस काळे कारण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधत असतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने जर केस काळे ठेवायचे असतील तर, कपालभारती हा प्राणायम जर नियमित केला तर तुमचे केस पांढरे होणार नाहीत.

* कपालभारती प्राणायमचे विविध फायदे खालीलप्रमाणे *

१) हे प्राणायम नियमित केल्याने केस पांढरे होत नाहीत.

२) यामुळे किडनी आणि लिव्हरची समस्या उध्दभवत नाही. तसेच रक्तभिसरण प्रक्रिया सुरळीत होते.

३) कपालभारती प्राणायमामुळे डोळ्याच्या खालचे डार्क सर्कल जातात. आणि डोळ्यावरचा ताण कमी होतो.

४) हे प्राणायम केल्याने चेहऱ्यावर चमक येते. व स्मरण शक्ती वाढते.

५) यामुळे आम्लपित्ताची समस्या दूर होते.

* कपालभारती प्राणायम कसे करावे *

सुखासनात बसावे, पाठीचा कणा ताठ ठेवावा व हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून गुडघ्यांवर ठेवावेत. श्वास घ्यावा. नंतर श्वास सोडता सोडता पोट आत घ्यावं. नाभीलाही पाठीच्या कण्याकडे ओढून घ्यावे. पण हे सहज शक्य होईल तेवढेच करावे. पोटाच्या स्नायूंची हालचाल जाणवावी म्हणून उजवा हात नाभीवर ठेवावा व नाभी आतल्या बाजूस ओढून घ्यावी. जसं ओटीपोट आणि नाभीकडचा भाग सैल सोडाल तशी फुफुसात हवा आपणहून शिरेल. अशा प्रकारे २० वेळा केल्याने एक चरण पूर्ण होते. एक चरण पूर्ण झाल्यानंतर डोळे बंद ठेऊन शरीरामध्ये होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष द्यावे.अशाप्रकारे अतिशय सोपा असा या प्राणायम आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु