‘या’ पानाचे ‘हे’ १० फायदे, खोकला, पायरियासह अनेक रोगांतून मिळेल मुक्ती

‘या’ पानाचे ‘हे’ १० फायदे, खोकला, पायरियासह अनेक रोगांतून मिळेल मुक्ती
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विड्याच्या पानांचा उपयोग पूजन कर्म, हवनामध्ये केला जातो. या पानाला भारतीय संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे. तसेच ही एक महत्त्वपूर्ण औषधीसुद्धा आहे. तोंडाची चव वाढवण्यासोबतच या पानांचा वापर विविध पारंपरिक औषधी उपायांसाठी केला जातो. विड्याच्या पानामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच टॅनिन तत्त्वासोबत कॅल्शियम, फास्फोरस, लोह तत्व, आयोडीन आणि पोटॅशियम असल्याचे, संशोधनात आढळून आले आहे.

हे उपाय करा

* पिंपल, पुरळ आल्यास विड्याची ताजी ८-१० पाने बारीक कुटून २ कप पाण्यात उकळून घ्यावीत. या पाण्याने चेहरा धुतल्यास फरक पडतो. दिवसातून ३-४ वेळेस काही दिवस नियमित हा उपाय केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.

*  रात्री घोरण्याची सवय असल्यास दिवसातून दोन वेळेस विड्याचे कच्चे पान खावे.

* वीर्यस्खलन किंवा शीघ्रपतनाची समस्या असल्यास विड्याच्या पानामध्ये अश्वगंधा चूर्ण टाकून या पानाचे दररोज सेवन करावे.

* या पानांचा रस स्तंभन शक्ती वाढवण्यासही उपयुक्त आहे.

* पायरियाचा त्रास असल्यास विड्याच्या पानामध्ये शेंगदाण्या एवढा कापूर टाकून पान चावून खावे आणि थुकत राहवे. पानाची थुंकी गिळू नये.

* लघवी करताना त्रास होत असेल तर दुधामध्ये विड्याची दोन पानं उकळून ते दुध प्यावे.

* हात किंवा पाय मुडपल्यास विड्याच्या पानावर मोहरीचे तेल लावून हे पान गरम करून मुडपलेल्या जागेवर बांधावे.

* विड्याचे पान मधासोबत खाल्ल्याने शरीराला स्फूर्ती मिळते.

* सर्दी, खोकला आणि ताप असल्यास या पानांचा वापर करवा. हळकुंडाचा तुकडा थोडासा गरम करून पानामध्ये टाकून खावा.

* १५ पाने तीन कप पाण्यामध्ये उकळून घ्यावीत. उकळलेल्या पाण्यामध्ये मध टाकून हे पाणी पिल्यास जुना कफ बाहेर पडतो तसेच खोकल्यात आराम मिळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु