‘हे’ छोटे फळ तुम्हाला ठेवू शकते निरोगी, हे आहेत ७ मोठे फायदे, अवश्य वाचा

‘हे’ छोटे फळ तुम्हाला ठेवू शकते निरोगी, हे आहेत ७ मोठे फायदे, अवश्य वाचा
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सफरचंद, अननस, चिकू, संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष इत्यादी फळे नेहमी खाण्यात असतात. परंतु, या फळांच्या तुलनेत बोर हे फळ नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. दुर्गम भाग, उजाड माळरानावर सुद्धा बोराची झाडे मोठ्याप्रमाणात दिसून येतात. परंतु, मागणी कमी असल्याने ती बाजारात मोठ्याप्रमाणात दिसत नाहीत.

हे हंगामी फळ कच्चे असताना हिरव्या तर पिकल्यानंतर लाल रंगाचे दिसते. बोर हे औषधी फळ आहे, हे अनेकांना माहिती नाही. चीनमध्ये तर विविध औषधी बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे ऊर्जेचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. हे फळ कोणत्या आजारांवर उपयोगी आहे हे जाणून घेवूयात.

Related image
कँसर
कँसरच्या कोशिकांना नियंत्रित करण्याचा महत्त्वाचा गुण बोरांमध्ये असतो.

Related image
लिव्हर
यातील अँटी-ऑक्सीडेंट्स लिव्हरशी संबंधीत समस्या दूर करतात.

Image result for रोग प्रतिकारक क्षमता
रोग प्रतिकारक क्षमता
यामधील व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियममुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते.

अँटी-ऐजिंग
याच्या सेवनाने त्वचा दिर्घकाळ तरुण राहते. यातील अँटी-ऐजिंग तत्त्व त्वचेला तजेलदार ठेवतात.

Image result for बध्दकोष्ठता
बध्दकोष्ठता
बध्दकोष्ठतेमध्ये बोर खाणे फायद्याचे असते. बोर हे पचनक्रिया चांगली करते.


दात
यातील कँल्शियम आणि फॉस्फरस दात आणि हिरड्यांना मजबूत बनवते.

‘हे’ छोटे फळ तुम्हाला ठेवू शकते निरोगी, हे आहेत ७ मोठे फायदे, अवश्य वाचा
वजन
बोरांमध्ये खुप कमी प्रमाणात कॅलरी असतात. यामुळे वजन कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु