व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – व्यायाम ही नियमित करण्याची प्रक्रिया असल्याने कधी-कधी कंटाळा येऊ शकतो. यासाठी व्यायामामध्ये नाविन्य असणे गरजेचे आहे. तसेच थोडा वेगळ्या पद्धतीने व्यायाम केल्यास व्यायामाचा कंटाळा येणार नाही. अशाप्रकारचा व्यायाम घरी केल्यास अधिक उत्तम आहे. व्यायामात खंड पडू नये म्हणून ही वेगळ्यापद्धीने व्यायाम करणे फायदेशिर असू शकते. हा कसा करावा, यासदंर्भातील माहिती आपण घेणार आहोत.

व्यायाम करण्यासाठी एखादा जोडीदार मिळाला तर व्यायामाचा आनंद वाढू शकतो. एकट्याने व्यायाम करणे कंटाळवाणे ठरू शकते. मात्र जोडीदारासोबत व्यायाम करणे सोपे होते. असा व्यायाम निवडा जो जोडीदारासोबत जुगलबंदीने करता येऊ शकतो. जोडीदारा सोबत करता येण्यासारखा व्यायाम करण्यासाठी प्रथम जमिनीवर पाठ करून झोपा आणि गुडघे वाकवून पंजे जमिनीवर ठेवा. जोडीदार तुमच्या मागे गुडघ्यावर बसेल. आता तो रेसिस्टन्स ट्यूब किंवा दोरी तुमच्या पायाकडून खांद्याकडे घेऊन जाईल. तोपर्यंत तुम्ही पाय हळूहळू सरळ करा आणि नंतर छातीकडे घेऊन जा. दहा ते बारा वेळा असे केल्यानंतर जागा बदलावी.

दोरड्ड्या मारण्याचा व्यायाम हा खूप लाभदायी आहे. हा व्यायाम बालपणी तुम्ही नक्की केला असेल. दोन्ही जोडीदारांनी समोरासमोर उभे राहावे आणि हातात दोरी पकडावी. आता सोबत शक्य तितकी उंच उडी मारावी. येथे एकाच रिदममध्ये एकाचवेळी उडी मारणे आवश्यक आहे. अन्यथा दुखापत होण्याची भीती असते. किमान दहा वेळा दोरीउड्या माराव्यात. जोडीदाराबरोब करता येण्यासारखा आणखी व्यायाम म्हणजे दोन लोक नाव चालवण्याचा अभिनय करू शकतात. दोघांनी एकमेकांच्या समोर उभे राहावे आणि दोन रेसिस्टन्स ट्यूबच्या साह्याने एकमेकांना घट्ट बांधावे. पुढचा जोडीदार मागच्या जोडीदाराचा हात पकडून पुढच्या बाजूस शरीर ओढावे आणि मागच्या जोडीदाराने मागे ओढण्याचा प्रयत्न करावा. असे आठ ते दहा वेळा केल्यास आपली जागा बदला आणि नंतर पुन्हा हाच व्यायाम करावा. हा करताना वेगळाच आनंद मिळू शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु