‘या’ सवयीमुळे वाढू शकतो ‘हार्ट अटॅक’ चा धोका! जाणून घ्या माहिती

‘या’ सवयीमुळे वाढू शकतो ‘हार्ट अटॅक’ चा धोका! जाणून घ्या माहिती

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अंगदुखी, डोकेदुखी, तापाची कणकण, पाय दुखणे, असा त्रास होत असल्यास अनेकजण मेडिकल स्टोअर्समधून पेनकिलर्स आणून ती घेतात. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारे पेनकिलर घेणे घातक ठरू शकते. ही सवय घातक असून यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

हे लक्षात ठेवा

* पेनकिलर्समुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो आहे.

* पेनकिलर घेतल्यावर पहिल्या आठवड्यापासूनच हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, असे संशोधक सांगतात.

* वारंवार पेनकिलर्स घेतल्यास हृदयविकाराचा धोका आणखीच वाढतो. पेनकिलर घेतल्यानंतर तब्बल एक महिन्यापर्यंत हार्टअटॅकचा धोका असू शकतो.

* पेनकिलर्सचे उच्च डोस सातत्याने घेण्याच्या सवयीला वैद्यकीय परिभाषेत नॉनस्टिरॉयडल अँण्टी इन्फ्लमेटरी ड्रग्ज (एनएसएआयडी) असे म्हणतात. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु