कडूलिंबाच्या पानांचा हा फेसपॅक तुमचे सौंदय आणखी वाढवेल

कडूलिंबाच्या पानांचा हा फेसपॅक तुमचे सौंदय आणखी वाढवेल

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – कडूलिंबाचे झाड हे खूप औषधी म्हणून ओळखले जाते. या झाडाची पाने, साल, खोड, फळे या सर्वांमध्ये औषधी गुण आहेत. म्हणूनच आयुर्वेदात या झाडाला खूप महत्व आहे. हजारो वर्षांपासून कडूलिंबाच्या झाडाचा विविध औषधांसाठी उपयोग केला जातो. यासाठी पूर्वी लोक दारामध्ये आवर्जून कडूलिंबाचे झाड लावत असत. आजही अनेक घरे, इमारती, सोसायटीमध्ये मोकळ्या जागेत कडूलिंबाची झाडे लावली जातात. कडूलिंब त्वचेसोबत केसांना निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे. दररोजच्या जीवनात लिंबाचा वापर करून निरोगी राहता येईल.

अशा बहुगुणी कडूलिंबाच्या पानांपासून बनविलेला फेसपॅक हा चेहरा निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे. हा फेसपॅक बनविण्यासाठी कडूलिंबाची काही पाने आणि संत्र्याच्या काही साली पाण्यात टाकून उकळवा. यापाण्यात मध, दही आणि सोया मिल्क टाकून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. या पेस्टमुळे चेहऱ्याची त्वचा निरोगी राहते. त्वचेवरील क्रॅक्स, व्हाइट आणि ब्लॅक हेडस नाहीसे होतात. ही पेस्ट आठवड्यातून तीन वेळा लावल्यास चेहरा नितळ आणि सुंदर दिसू लागतो.

कडूलिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. याचा वापर करून सौंदर्य अधिक खुलवता येऊ शकते. कडूलिंबाचे सौंदर्यासाठी आणखी काही उपाय आपण जाणून घेवूयात. दोन लिटर पाण्यात लिंबाची सुमारे पन्नास पाने टाकावी. पानांचा रंग बदलून पाणी हिरवट होईपर्यंत उकळवावे. हे पाणी गाळून एका बाटलीत भरून ठेवावे. रोज अंघोळ करताना यातील १०० मिली पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळावे. यातील एंटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुण त्वचेला होणारे संसर्ग, व्हाइट हेडची समस्या दूर करतात.

आणखी एक उपाय म्हणजे लिंबाची पाने उकळून त्यात मध मिसळावे. ही पेस्ट केस आणि केसांच्या मुळांना चांगल्या प्रकारे लावावी. यामुळे केसांचे कंडिशंड होते. तसेच केसांतील शुष्कपणा, कोंडा कमी होतो. लिंबाच्या सालीचा उपयोग केल्याने केसातील कोंडा आणि उवा निघून जातात. तसेच लिंबात संसर्गविरोधी घटक आणि एनाल्जेसिक प्रॉपर्टीज असतात. हे घटक त्वचेला अँलर्जी आणि संसर्गापासून वाचवतात. लिंबाची पाने उकळवून हे पाणी संसर्ग झालेल्या ठिकाणी लावावे. काही दिवसांत फरक पडतो.

निरोगी शरीरासाठी कडूलिंबाचे आणखी काही घरगुती उपाय आहेत. कावीळ झाली असल्यास पपईच्या लहान आणि नरम पानांना वाटून पेस्ट तयार करावी. अर्धा चमचा पेस्ट मधासोबत घ्यावी. कावीळ लवकर बरी होईल. रोज सकाळी चेहरा क्लींजरने साफ करावा. यामुळे चेहरा फ्रेश दिसेल. अंघोळ करताना सुद्धा वॉशेबल क्लींजरचा वापर करू शकता. तसेच साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी एक ग्लास पाण्यात आंब्याची १० ते १५ पाने उकळून रात्रभर तसेच ठेवावीत. सकाळी उठल्यावर हे पाणी प्यावे. साखर नियंत्रणात राहते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु