नात्याचा उलघडा करतात झोपण्याच्या ‘या’ पद्धती, पाहा तुम्ही कसे झोपता 

नात्याचा उलघडा करतात झोपण्याच्या ‘या’ पद्धती, पाहा तुम्ही कसे झोपता 

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपली बॉडी लँग्वेज आपल्या स्वभावाविषयी अनेक गोष्टी सांगून जाते. त्याप्रमाणेच जोडीदाराबरोबर आपण कसे झोपतो यावरून जोडीदारासोबतचे आपले नाते कसे आहे हे सुद्धा स्पष्ट होते. प्रत्येक जोडप्याची झोपण्याची पध्दत वेगळी असते. स्लिपिंग पोजिशन आणि तुमचे नाते यांचा संबंध कसा असतो, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

वर-खाली होऊन झोपणे
पति किंवा पत्नी दोघांपैकी एक जर वर होऊन झोपत असेल आणि दुसरा त्यापेक्षा थोडे खाली होऊन तर याचा अर्थ दोघांमध्ये वर झोपणारा कॉन्फिडेंट असल्यासोबतच डोमिनेटिंग नेचरचा आहे. समान पातळीत झोपणे समान विचार दर्शवते.

लोअर बॅक टच 
या स्थितीत झोपणारे जोडपे एकमेकांना योग्य स्पेस देतात. यामुळे यांचे नाते घट्ट असते. परंतु काही जण श्वासाची दुर्गंधी आणि घोरणे हे देखील पाहतात.

हातांना टच करुन झोपणे
ही स्थितीसुद्धा झोपण्याच्या सामान्य स्थिती पेक्षा वेगळी आहे. जेव्हा पति-पत्नी एकमेकांच्या हातांना स्पर्श करुन झोपतात याचा अर्थ दोघांचे विचार वेगळे असले तरी, आपसात खुप प्रेम आहे. ते प्रत्येक समजून घेतात.

बेडच्या काठांवर झोपणे
यांना नात्यामध्ये स्पेस हवा असतो. स्वतंत्र आणि खुल्या विचारांविषयी खुप जास्त पझेसिव्ह असल्यामुळे यांचे नाते तुटू शकते. अशा वेळी बोलून समस्या दूर करावी.

वेगळ्या वेळेवर झोपणे
पति-पत्नीचे वेगवेगळ्या वेळेवर झोपणे ही त्यांच्या बिघडत चाललेल्या रिलेशनशीपची सुरुवात असते. दोघेही एकमेकांची काळजी करत नाहीत, असा त्याचा अर्थ होऊ शकतो.

मागुन हग करुन झोपणे
जोडीदाराला मागुन हग करुन झोपणे म्हणजे एकमेकांची काळजी आहे, असे दर्शवते. तसेच पझेसिव्हनेस सुध्दा दर्शवते.

एकमेकांकडे पाठ करुन झोपणे
एकमेकांकडे पाठ करुन झोपणे हे वादाचे लक्षण असू शकते. परंतु पाठ टच करु झोपण्याचा अर्थ भांडणे होऊनही तुम्ही एकमेकांशिवाय राहू इच्छित नाही, असा अर्थ होतो.

चिटकून झोपणे
अशा पद्धतीने झोपलेल्या जोडप्यातील पुरूष आपल्या साथीदाराला अधिक प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. जोडीदाराला अधिक प्रेम देण्याची इच्छा व्यक्त करत असतो. महिला देखील ते प्रेमाने स्विकारत असते.

समोरासमोर तोंड करुन झोपणे
या स्लीपिंग पोझिशनमध्ये पती-पत्नी खुप कमी झोपतात. परंतु काही कपल्स या पोझिशनमध्ये झोपतात. याचा अर्थ एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होणे हा आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु