‘हे’ ५ व्हिटामिन्स शरीरासाठी आवश्यक, कमतरतेमुळे होतात ‘या’ आरोग्य समस्या

‘हे’ ५ व्हिटामिन्स शरीरासाठी आवश्यक, कमतरतेमुळे होतात ‘या’ आरोग्य समस्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम : शरीराला विविध प्रकारच्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते. शरीराची ही गरज आहाराद्वारे पूर्ण केली नाही तर विविध प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. यासाठी योग्य, सकस आणि समतोल आहार खुप गरजेचा आहे. आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केल्यास कोणते व्हिटामिन्स शरीराला मिळतात हे आपण जाणून घेणार आहोत.

समस्या आणि उपाय
१ व्हिटामिन बी ६ शरीरात कमतरता निर्माण झाल्यास अमिनो अ‍ॅसिडची निर्मिती कमी होते. मुड आणि झोपेवर पिरणाम होतो. संधीवाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी आहारात मासे, अंडी, केळी आणि तृणधान्यांचा भरपूर समावेश करावा.

२ व्हिटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यास लाल रक्तपेशींची वाढ होत नाही. रक्तातील लोहाला ऑक्सिजनकडून प्रोटीन घेणे आणि हिमोग्लोबिन घेण्याच्या कामावर परिणाम होतो. अंड, चीज, सुका मेवा आणि हिरव्या पालेभाज्यांमधून व्हिटामिन बी १२ जास्त मिळते.

३ व्हिटॅमिन बी ७ ची कमतरता निर्माण झाल्यास केस, त्वचा आणि नखांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहात नाही. गरोदर स्त्रीयांना त्रास होऊ शकतो. बाळाच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होतो. यासाठी रासबेरी, बदाम, अक्रोड आणि केळ्यांचे सेवन करावे.

४ व्हिटामिन ए ची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास दृष्टीवर विपरित परिणाम होतो. त्वचेचे आरोग्य बिघडू शकते. शरीरात जळजळ होऊ शकते. वयवाढीची चिन्हे दिसू लागतात. यासाठी गाजर, आंबे, मासे आणि भोपळा मिरचीचा आहारात समावेश करावा.

५ शरीरात व्हिटामिन बी २ ची कमतरता निर्माण झाल्यास शरीरातील पेशींना हानी पोहचवणारे तंतू वाढतात. वय वाढीची चिन्हे दिसू लागतात. ह्रदयरोग वाढण्याची शक्यता असते. लाल रक्त पेशींच्या वाढीवर परिणाम होतो. शरीरातील रक्त आणि ऑक्सिजनच्या प्रवाहावर परिणाम होतो. यासाठी चीज, अंडी, हिरव्या पालेभाज्या आणि मासे सेवन करावेत.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु