‘ही’ ६ लक्षणे दिसल्यास समजावे; बाळाच्या शरीरात आहे ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता

‘ही’ ६ लक्षणे दिसल्यास समजावे; बाळाच्या शरीरात आहे ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विटामिन-डी ची कमतरता असलेल्या अर्भकांवर उपचार करण्यासाठी व्हिटॅमिन-डी चा एक डोस त्यांना तोंडावाटे देण्यात येतो. त्यानंतर तीन आठवडयांनी त्याच्या शरीरात हे औषध किती प्रमाणात शोषले गेले आहे हे तपासण्यासाठी पुन्हा एक्स-रे काढण्यात येतो. व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे बाळाच्या शरीरात कॅल्शियम व फॉस्फरसच्या कमी शोषणामुळे मुडदूस हा विकार होऊ शकतो. मुडदूस हा विकार सहा ते छत्तिस महीन्यांच्या बाळांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो.

ही आहेत लक्षणे

हाडांमध्ये विकृती
विटामिन-डी चा अभाव असल्यास बाळाच्या पायांमध्ये बाक असतो. अर्भकाचा पाठीचा कणा सुद्धा सरळ नसतो. हाडांचा विकास व वाढ होऊ शकत नाही.

टाळूमध्ये खळगा
विटामिन-डी च्या अभावामुळे मुडदूस झाल्यास बाळाची टाळू भरुन निघण्यास उशीर होतो. त्यांचे डोके मऊ लागते.

कमकुवत स्नायू व वेदना
ठराविक वाढीनंतर सुद्धा अशा मुलांच्या स्नायूंमध्ये वेदना होत असल्याने ती व्यवस्थित रांगू किंवा बसू शकत नाहीत. उभे राहणे, शरीराचा तोल सांभाळणे त्यांना कठीण जाते. यामुळे मुले अधिक रागीट, चिडचिडी होतात.

इनफेक्शन
विटामिन डी च्या अभावामुळे मुलांना वारंवार इनफेक्शन होते.

विकासावर परिणाम
विटामिन-डी च्या कमतरतेमुळे किंवा मुडदूस झाल्यामुळे बाळाच्या संपुर्ण विकासावर विपरित परिणाम होतो. वजन नीट सांभाळण्यास सक्षम नसल्यास अथवा त्याच्या पायांवर सूज असल्यास डॉक्टरांकडे जा. कारण विटामिन डीच्या कमतरतेमुळे असे होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु