मुलींमध्ये अठराव्या वर्षानंतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या, करा ‘हे’ उपाय

मुलींमध्ये अठराव्या वर्षानंतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या, करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  एका विशिष्ट वयानंतर मुलींच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. हार्मोनलमुळे हे बदल घडत असतात. यामुळे कधी-कधी काही आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात. अशावेळी योग्य काळजी घेणे खुप महत्वाचे असते. साधारणत: १८ वर्ष वयानंतर मुलींच्या शरीरात ६ महत्वाचे बदल घडून येतात. यावेळी निर्माण होत असलेल्या समस्यांवर कोणते उपाय करावेत, आणि या समस्या कोणत्या याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

समस्या आणि उपाय

मासिक पाळी
मासिक पाळीच्या वेळेत समस्या निर्माण होतात. यासाठी फळे आणि हिरव्या भाज्या खा. योग्यवेळी डॉक्टरांकडे जा.

स्वच्छता
१८ वर्षानंतर मुलींच्य शरीरात अनेक बदल होतात. अशावेळी काही शरीराची स्वच्छता ठेवली पाहिजे. अनावश्यक केस काढण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रिम किंवा रेजरचा वापर करा.

रोग प्रतिकारशक्ती
हार्मोनल बदल घडत असल्याने मुलींची प्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे त्या धाडसी होतात.

केस
हार्मोनल बदलांमुळे केस कोरडे आणि रफ होतात. यासाठी ३-४ चमचे ऑलिव्ह ऑइल गरम करुन ते कोमट झाल्यावर केसांवर मसाज करा. नंतर टॉवेल वाफेवर गरम करुन केसांवर बांधा.

लठ्ठपणा
याकाळात मेटाबॉलिज्म सावकाश झाल्याने वजन वाढते. यासाठी जास्त तेलकट, साखरयुक्त पदार्थ खाऊ नका. रोज ३० मिनिटे चाला. व्यायाम करावा.

पिंपल्स
हार्मोनल बदलांमुळे पिंपल्स, त्वचा कोरडी होणे, अशा समस्या होतात. यासाठी जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका. चेहरा दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याने धुवा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु