‘ब्लॅक कॉफी’च्या सेवनाने दूर होतील ‘हे’ आजार

‘ब्लॅक कॉफी’च्या सेवनाने दूर होतील ‘हे’ आजार

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळची सुरुवात होते ती चहा आणि कॉफीने. चहा आणि कॉफी मुळे दिवस चांगला जातो आणि शरीरात एक प्रकारचा ताजेपणा येतो. पण यातील एक मनोरंजक गोष्ट म्हणजे जे लोक कॉफी पितात त्यांना आरोग्याशी संबंधित बरेच फायदे होतात. कॉफी पिल्यानंतर तुम्हचा उत्साह वाढतो आणि थकवाही कमी होतो. कॉफिचेही अनेक प्रकार आहेत. या मधला एक प्रकार म्हणजे ब्लॅक कॉफी. चला जाणून घेऊया या ब्लॅक कॉफीचे फायदे.

*ब्लॅक कॉफीचा सेवन बिना साखरेचा आणि दुधाचा केला जातो. हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते. यात कैफीनचा प्रमाण कमी असतो. यातील एन्टी अक्सिडन्ट, कैल्शियम आणि पोट्याशियम शरीरातील आजारांना दूर करतात.

*ब्लॅक कॉफी मेटाबॉलिक रेट वाढवून शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. तसेच वजन कमी करण्यासही मदत करते.

*ब्लॅक कॉफीमुळे स्मरण शक्तीही वाढते. एका संशोधनात असे लक्षात आले की ब्लॅक कॉफी सेवनाने अल्जाइमर सारखे आजार कमी करण्यास मदत होते.

*ज्या लोकांना डायबेटिज आहे अशा लोकांसाठी ब्लॅक कॉफी खूप फायदेमंद आहे. ब्लॅक कॉफी शरीरातील इंसुलिन वाढण्यास मदत करते. त्याचसोबत शुगर लेवलही नियंत्रित ठेवते.

*ब्लॅक कॉफीच्या सेवनाने कोलेस्ट्रोल कंट्रोल होतो. म्हणूनच हृदयाशी संबंधित आजार दूर होऊ शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु