पावसाळ्यातील ‘या’ १० चुका देतात आजारांना आमंत्रण, करू नका दुर्लक्ष

पावसाळ्यातील ‘या’ १० चुका देतात आजारांना आमंत्रण, करू नका दुर्लक्ष

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – पावसाळ्यात व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. थोडी काळजी घेतल्यास आणि काही चुका टाळल्यास पावसाळ्यातही आपण निरोगी राहू शकतो. पावसाळ्यात कोणत्या १० चुका केल्यास आपण आजारी पडू शकतो, याविषयी जाणून घेवूयात.

या चूका टाळा

जंक फूड तसेच रस्त्यावरील उघडे खाद्यपदार्थ खाणे टाळा.

वातावरण थंड असल्याने थंड पदार्थ आणि पेय घेऊ नका. यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते. ताप येऊ शकतो.

या दिवसात किटाणू, जंतू जास्त पसरतात. यामुळे सतत हातापायांची स्वच्छता करा.

पावसात जास्त भिजल्याने शरीराचे तापमान कमी होऊ शकते. यामुळे ताप, न्युमोनिया होऊ शकतो. स्किन डिसीज, फंगल इन्फेक्शन होऊ शकते.

या दिवसात कपडे लवकर वाळत नाहीत. ओलसर, दमट कपडे घातल्याने फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकते.

घरात तसेच बाहेर साचलेल्या पाण्यात डास वाढल्याने डेंग्यू, चिकूनगुनियासारखे आजार होऊ शकतात.

या दिवसात कच्चे सलाड आणि खूपवेळ कापून ठेवलेली फळे खाल्ल्याने पोटाचे आजार होतात.

पावसाळ्यात तहान कमी लागते. परंतु, पाणी भरपूर प्यावे. अन्यथा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. बद्धकोष्ठता तसेच त्वचा शुष्क होऊ शकते.

या दिवसात सूर्यप्रकाश जास्त नसल्याने आळस आणि झोप येते. यामुळे शरीराचे बायोलॉजिकल घड्याळ बिघडते. यामुळे मानसिक ताण येतो.

१० पावसाळ्यात कॉफी, चहा पिणे चांगले वाटते. परंतु, यामुळे भूक न लागणे, अ‍ॅसिडिटी, लठ्ठपणा, निद्रानाश अशा समस्या होऊ शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु