‘हे’ आहेत पायांना अधिक सक्षम करणारे व्यायाम प्रकार, जाणून घ्या

‘हे’ आहेत पायांना अधिक सक्षम करणारे व्यायाम प्रकार, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपण कोणता व्यायाम करतो हे सुद्धा महत्वाचे असते. काही व्यायाम केल्याने केवळ कंबरेपासून वरचे शरीर सदृढ होते. तर काही व्यायाम प्रकारांनी केवळ कंबरे खालील शरीर मजबूत होते. परंतु, अनेकदा कंबरेच्या वरील भागासाठीच व्यायाम केले जातात. त्यामुळे पाय, पोटऱ्या, मांड्या सदृढ होत नाहीत.

लोअर बॉडीसाठी विशेष व अचूक व्यायाम प्रकारांची गरज असते. यात आहार व आनुवंशिकता हे घटकही महत्त्वाचे असतात. गुणसूत्रांच्या प्रवृत्तीप्रमाणे चरबीचे शरीरात वितरण होत असते. कोणत्या भागात स्थूलता वाढते हे अनेकदा गुणसूत्रांच्या प्रभावाने ठरते. वर्कआऊटने शरीरयष्टी बदलता येत नाही, मात्र स्नायूंना व्यवस्थित टोन करणे शक्य असते.

या गोष्टी लक्षात ठेवा 
कार्डिओ वर्कआऊट वाढवा. स्विमिंग, जॉगिंग, स्टेपिंग व इंटव्र्हल ट्रेनिंगमुळे उष्मांक लवकर कमी होतात. कार्डिओ आठवड्यातून किमान ५ दिवस घ्यावा. ४५ ते ६० मिनिटांचे कार्डिओ दरदिवशी करावे. त्यामुळे पायांचे स्नायूही आटोक्यात येतात.

हाय किक्स
पायांचे व्यायाम केल्याने फायदा होतो. एक दिवसाच्या मध्यंतराने हा व्यायाम करावा. कार्डिओनंतरही लेग एक्सरसाइज घेता येते. हाय किक्स म्हणजे पायांना खांद्याच्या पातळीपर्यंत उचलणे. या किकमध्ये पाय शक्य तेवढा वर उचला. याचे २० रिपीटेशनचे २ ते ३ सेट करावेत.

बॉक्स स्टेप-अप
१० ते १२ इंच उंचीचे स्टेपर यासाठी वापरावे. डाव्या व उजव्या पायाने एकानंतर एक स्टेप-अप्स करा. याचा सराव झाल्यावर स्टेपर जंप सुरू करा.

स्क्वॅड्स
रेग्युलर स्क्वॅड्सचा सराव झाल्यावर त्याचे प्रमाण वाढवा. नंतर जंपिंग करा. बोसू बॉल स्क्वॅडसचे सेटही अल्टरनेट करावेत.

लंजेस
प्रथम लंजेसचे तंत्र अवगत करा. याच्या पोझिशन्स समल्या की विविध प्रकार शिका. यात वॉकिंग लंजेस व अल्टरनेट लंजेस लाभदायक असतात

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु