‘या’ आहेत महिलांमधील सेक्सशी संबंधित सामान्य समस्या, वेळीच करा उपाय

‘या’ आहेत महिलांमधील सेक्सशी संबंधित सामान्य समस्या, वेळीच करा उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आजही सेक्स समस्येबाबत उघडपणे आणि निसंकोचपणे बोलणारे खूप कमी लोक आहेत. त्यातही महिला याबाबत अजिबात बोलत नाहीत. याबाबत जागरूकता कमी असल्याने महिला वेळीच डॉक्टरकडे जात नाहीत. यामुळे त्यांच्यातील सेक्स समस्या वाढत जातात. अशा समस्या निर्माण झाल्यास वैवाहिक जीवनावरही त्याचा परिणाम होतो. सेक्स करताना कोणतीही समस्या जाणवल्यास डॉक्टरांकडे जाणे हाच योग्य पर्याय आहे.

सेक्सशी संबंधित सामान्य समस्या  

* मासिक पाळी सुरु झाल्यानंतर मुलींमध्ये हार्मोन्स बदलामुळे सतत शारीरिक बदल होत असतात. सेक्स करताना किंवा सेक्स करण्यापूर्वी गर्भधारणेपासून दूर राहण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे नियमित सेवन केल्याने, हे बदल आणखी वेगाने होत असतात.

* अनेकवेळा प्युबिक हेयर्सची योग्यप्रकारे स्वच्छता न केल्यामुळे त्यामधील किटाणू योनी मार्गात जाऊन योनी तसेच गर्भाशय संबंधित समस्या होतात. यामुळे यौनांगांची योग्य स्वच्छता करणे गरजेचे असते.

* मुत्रमार्गातील संक्रमणास यूटीआय म्हणजेच यूरीनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हटले जाते. महिलांच्या युरीन मार्गाच्या विशिष्ठ संरचनेमुळे ही समस्या निर्माण होते. युरीन मार्गातील जळजळ, खाज ही विविध कारणांमुळे होऊ शकते. परंतु ८० टक्के प्रमाणात ही समस्या यौन संबंधामुळे होते. लग्नानंतर अज्ञानता, भीती, मानसिक दडपण या कारणांमुळे यूटीआय होण्याची शक्यता जास्त असते.

* महिलांनी डॉक्टरांशी निसंकोचपणे अशा समस्यांवर बोलले पाहिजे. स्तनामध्ये वेदना होत असल्यास मुली याकडे सामान्य गोष्ट समजून दुर्लक्ष करतात. परंतु या वेदना पुढे स्तन कॅन्सरचे रूप धारण करू शकतात.

* अनेक महिलांना सेक्स करण्यात आजीबात रस नसतो. ही एक गंभीर सेक्स समस्या असू शकते. ही स्थिती मेनोपोजनंतर निर्माण होऊ शकते. परंतु, यापूर्वी महिलांमध्ये सेक्सची इच्छा नसणे एक समस्या आहे.

* सेक्समधील परमोच्च आनंदाला ऑर्गेज्म म्हणतात. महिलांमध्ये ही स्थिती हळू-हळू किंवा खूप उशिरा निर्माण होते. यामुळे अनेक महिलांना या गोष्टीची जाणीवही होत नाही. महिलांना निसर्गानेच पुरुषांच्या तुलनेत जास्त वेळेस ऑर्गेज्मपर्यंत पोहोचण्याची क्षमता दिली आहे.

* युवावस्थेत महिलांमध्ये योनीतून पांढऱ्या, चिकट पाण्याचा स्राव होणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. सामान्य भाषेत याला पांढरे पाणी किंवा ल्यूकोरिया म्हटले जाते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु