शरीरात हिमोग्लोबिन कमी होण्याची ‘ही’ आहेत ४ कारणे, जाणून घ्या ३ उपाय

शरीरात हिमोग्लोबिन कमी होण्याची ‘ही’ आहेत ४ कारणे, जाणून घ्या ३ उपाय

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : हिमोग्लोबिन हा रक्तामधील आवश्यक घटक असून, हा लोह आणि प्रथिने यापासून तयार झालेला असतो. याची मात्रा नियंत्रित राहणे खुप गरजेचे असते. हिमोग्लोबिनची मात्रा गरजेपेक्षा कमी झाल्याने अ‍ॅनिमियासारख्या अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यास आहारातील लोहाचे शोषण न झाल्यामुळे शरीरात विविध घडामोडी होत असतात. लोहयुक्त पदार्थांचे सेवन करताना काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत. काही खास गोष्टींचा समावेश आहारात यासाठी केला पाहिजे.

ही आहेत प्रमुख कारणे
१ आहारातील लोह तसेच व्हिटॉमिन बी-१२ व फॉलिक ऑसिड तसेच व्हिटॅमिन सीच्या अती कमतरतेमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
२ अतिरक्तस्त्राव, मूळव्याध किंवा आतड्यांचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सरमुळे होणारा रक्तस्त्राव.
३ अयोग्य आहार.
४ अत्यावश्यक पोषकतत्त्वांची कमतरता.

हे आहेत परिणाम
१ अनेमिया हा विकार होतो.
२ त्वचा पांढरी होणे, निस्तेज होणे.
३ अशक्तपणा वाढतो.
४ चक्कर येणे, छातीत दुखणे.
५ स्मृतिभ्रंशाची समस्या.

हे आहेत उपाय
१ हिमोग्लोबिन कमी असल्याचे काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
२ नियमितपणे तपासणी करत राहावे.
३ आहारात योग्य प्रमाणात पालक, ब्रोकोली, लाल भोपळा, इतर फळभाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स, सफरचंद, डार्क चॉकलेट, पालेभाज्या, ब्राऊन राईस, फ्लॅक्स सीड्स इत्यादींचा समावेश करा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु