‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे

‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अस्थमा म्हणजे दमा होय. हा आजार श्वसन तंत्राशी संबंधित आहे. या आजारात श्वासनलिकेच्या मार्गात सूज येऊन मार्ग आकुंचन पावल्याने रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो, लहान श्वास घ्यावा लागतो. छातीत एकप्रकारचा तणाव निर्माण होतो. श्वास भरून येतो आणि जोरदार खोकलाही येतो. अस्थमाची लक्षणे आणि कारणे जाणून घेवूयात.

ही आहेत कारणे
१ थंड पदार्थांचे सेवन
२ अ‍ॅलर्जी
३ अनुवंशिक कारण
४ मानसिक तणाव
५ धुम्रपान
६ मद्यसेवन
७ धूळ आणि वायु प्रदुषण
८ सर्दीची समस्या
९ वातावरणातील बदल
१० संसर्ग

अस्थमाची लक्षणे
१ श्वास घेतांना घाबरल्यासारखे होणे
२ श्वास घेताना घाम सुटणे
३ अस्वस्थता जाणवणे
४ श्वास घेण्यास त्रास होणे
५ छातीत तणाव निर्माण होणे

अशी घ्या काळजी
व्यायाम आणि योगासने करुन शांत व्हा. तोंडाने श्वास घेऊ नये. नेहमी सोबत इनहेलर ठेवा. घर नेहमी स्वच्छ ठेवा. धूळ-मातीपासून दू रहा. अस्थम्याचा अटॅक आल्यास सरळ ताठ उभे राहा, झोपून राहू नका. मोठा श्वास घ्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या. सैल कपडे घाला.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु